नील डिग्रास टायसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नील डिग्रास टायसन (५ ऑक्टोबर, १९५८:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हे अमेरिकन अंतरिक्षभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. हे न्यू यॉर्क शहरातील रोझ सेंटर फॉर अर्थ ॲंड स्पेस मध्ये असलेल्या हेडन तारांगणाचे निदेशक आहेत. हे प्रिन्सटन विद्यापीठात पाहुणे व्याख्याता आणि संशोधक आहेत.

टायसन यांनी हार्वर्ड विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट ऑस्टिन येथे उच्चशिक्षण घेतलेले आहे.

यांनी सोप्या शब्दांत विज्ञान समजावणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत व दूरचित्रवाणी मालिकांचे निरुपण केलेले आहे.