Jump to content

निर्मला देशपांडे (गांधीवादी नेत्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निर्मला देशपांडे

निर्मला देशपांडे (जन्म : नागपूर, १९ ऑक्टोबर १९२९; - नवी दिल्ली, १ मे २००८) ह्या सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या होत्या. मराठीतील विचारवंत लेखक पु.य. देशपांडे हे निर्मला देशपांडे यांचे वडील आणि लेखिका विमलाबाई देशपांडे या आई होत.

निर्मला देशपांडे या नागपूरच्या मॉरिस कॉलेजात पॉलिटिक्सच्या प्राध्यापिका होत्या. इ.स. १९५२मध्ये त्या विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सामील झाल्या, आणि त्यांनी विनोबांबरोबर ४० हजार किलोमीटरची पदयात्रा केली.

पहिल्यांदा १९९७साली आणि नंतर २००४ साली त्या राज्यसभेच्या राष्ट्रपतिनियुक्त सदस्य झाल्या. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने आणि राजीव गांधी सद्भावना पुरस्काराने सन्मानित केले होते.