निर्मलाताई सोवनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निर्मला मुकुंद सोवनी (माहेरच्या माणिक विष्णू घारपुरे; १६ डिसेंबर, इ.स. १९२९:नागपूर, महाराष्ट्र; ५ सप्टेंबर, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या एक समाजसेविका होत्या.

सोवनी यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांत पदवी प्राप्त केली. कर्वे समाजशास्त्र संस्थेतून त्यांनी सामाजिक कार्याची पदविकाही मिळविली.

समाजकार्य[संपादन]

  • १९५८पासून भारत स्काउट व गाईडची विविध पदे भूषवीत या संस्थेबरोबरही त्या अखेरपर्यंत काम करीत राहिल्या.
  • मो.ना. नातू आणि वि.ग. माटे यांनी सोवनी यांच्यावर डेव्हिड ससून अनाथ पंगू गृह व निवारा वृद्धाश्रमाची जबाबदारी सोपवली. संस्थेत दैनंदिन व्यवस्थापन, वृद्ध, रुग्णांची सेवा करण्याचे त्यांनी व्रत अंगीकारले. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच 'निवारा'मध्ये त्यांनी काळानुरूप बदल केले.
  • कुटुंबकल्याण योजनेसाठीही त्यांनी काम केले.

पुरस्कार[संपादन]

  • आगाशे स्मृती पुरस्कार
  • आदिशक्ती पुरस्कार
  • इंदुमती टिळक पुरस्कार
  • गिरिजाबाई रास्ते पुरस्कार
  • लक्ष्मीबाई पुरस्कार
  • भारत स्काउट व गाईड संस्थेचा ‘मेडल ऑफ मेरिट’ पुरस्कार