ना.के. बेहरे
Jump to navigation
Jump to search
नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचे 'सन अठराशे सत्तावन्न' या ग्रंथलेखनाचे काम सहा वर्षे चालू होते. शेवटी तो ग्रंथ १९२७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली, तर ८० वर्षांनी तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाळी. बराचसा विस्मृत झालेला १९२७ सालचा हा ग्रंथ आजही मौलिक आणि वाचनीय आहे.
ना.के बेहरे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके[संपादन]
- श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (वरदा प्रकाशन)
'सप्तर्षी' ही कविता सोलापूरचे चार हुतात्मे आणि लाहोर कट खटल्यातील फासावर चढलेले हुतात्मा भगतसिंग,राजगुरू, आणि सुखदेव आशा सात हुतात्म्यांवर सप्तर्षी ही कविता लिहिली त्यामुळे त्यांना सरकारी नोकरिस मुकावे लागले
पुरस्कार[संपादन]
- ना.के. बेहरे यांच्या नावाने नागपूर विद्यापीठाने मराठी विषयासाठी सुवर्णपदक ठेवले आहे. १९६६ साली हे पदक माणिक सीताराम गोडघाटे यांना मिळाले होते.
- साहित्य समीक्षक द.भि. कुलकर्णी यांनाहीे हे पदक मिळाले होते.
(अपूर्ण)