Jump to content

नाविका सागर परिक्रमा अभियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाविका सागर परिक्रमा अभियान हे भारतीय नौदलातील महिला कर्मचाऱ्यांनी चालविलेले एक अभियान आहे. भारतीय नौदलाची आयएनएसव्ही तारिणी ही नौका घेऊन काही महिला कर्मचारी हे अभियान राबवित आहे.ही एक अतिशय धाडसी मोहिम आहे.या अभियानात सहा महिलांचा समावेश आहे ज्याचे नेतृत्व नौदलातील लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत.

या मोहिमेचा कालावधी हा सुमारे १६५ दिवसांचा असून त्याची सुरुवात सप्टेंबरमध्ये झाली. या मोहीमेत ड्रेक पॅसेज हा खडतर टप्पा पार करणे याचाही समावेश आहे.ही मोहिम टप्प्या-टप्प्यांची आहे.

तब्बल २१६०० सागरी मैलांचा प्रवास आणि तोही शिडाच्या बोटीतून ! एकूण मोहीम २५४ दिवसांची.त्यातले १९४ दिवस समुद्रावर गेलेले. असंख्य आव्हाने. कसोटी पाहणारे प्रसंग.