नार्कोलेप्सी
Appearance
निद्रानाश याच्याशी गल्लत करू नका.
नार्कोलेप्सी हा एक दीर्घकालीन मेंदूविकार आहे. या विकारामुळे मेंदू निद्राचक्रावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. कदाचित या कारणामुळेच नार्कोलेप्सी आणि निद्रानाश या दोन वेगवेगळ्या रोगांमध्ये गोंधळ केला जातो. नार्कोलेप्सीचा रुग्ण कोणत्याही क्षणी झोपी जातो. यामुळे अशा रुग्णांना अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
नार्कोलेप्सिग्रस्त रुग्णांना मदत केली जाऊ शकते, पण बरे केला जाऊ शकत नाही. प्रत्येक रुग्णाला दिले जाणारे उपचार हे त्याच्या रोगाच्या स्तरांप्रमाणे ठरवले जातात.