नातू पुरस्कार
Appearance
भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नातू फाउंडेशनचे पुरस्कार प्रामुख्याने ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिले जातात.
पुरस्कार अनेक आहेत :
- महादेव बळवंत नातू पुरस्कार : ग्रामीण भागात किमान १५ वर्षे प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला जाणारा पुरस्कार. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार : ध्येयवादी वृत्तीने किमान पाच वर्षे पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्यास सेवाव्रती कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महादेव बळवंत नातू पुरस्काराचे मानकरी
[संपादन]- इ.स. २०१० : पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी
- इ.स. २०१२ : मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे
- इ.स. २०१३ : २० वर्षांहून अधिक काळ भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे
- इ.स. २०१५ : आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टरांअभावी वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉ. अशोक बेलखोडे
- इ.स. २०१६ : ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह सुभाष देशपांडे
सेवाव्रती पुरस्काराचे मानकरी
[संपादन]- इ.स. २०१० : तुळजापूर येथील कार्यकर्ते अशोक तांबे
- इ.स. २०१२ : धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील वनवासी कार्यकर्ते चैत्राम पवार
- इ.स. २०१३ : स्वतः पारधी समाजातून आलेले आणि सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे पारधी समाजासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे जगन्नाथ भोसले
- इ.स. २०१५ : आदिवासी नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या ठमाताई पवार
- इ.स. २०१६ : पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी
इतर नातू पुरस्कारांचे अन्य मानकरी
[संपादन]- इ.स. २०१०
- ज्ञानप्रबोधिनी, पुणे (दोन लाख रुपये)
- भातू कोल्हाटी विकास परिषद (करमाळा) आणि जनकल्याण रक्तपेढी (पुणे) (प्रत्येकी एक लाख रुपये)
- वेध संस्था (गडचिरोली) व वनवासी कल्याण आश्रम, ता. कर्जत (प्रत्येकी ६० हजार रुपये)
- इ.स. २०१२
- सेवा भारती, इचलकरंजी (एक लाख रुपये)
- श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक (एक लाख रुपये)
- कमला मेहता रुग्णालय, शिरवळ (एक लाख रुपये)
- ज्ञान प्रबोधिनी, पुणे (७५ हजार रुपये)
- जनसेवा फाउंडेशन, पुणे (५० हजार रुपये)
- आरोग्य सेना, पुणे (२५ हजार रुपये)
- अस्तित्त्व प्रतिष्ठान, पुरंदर (२० हजार रुपये
- डॉ. अविनाश पोळ, सातारा (२० हजार रुपये)
- संत सेवा संघ, विपश्यना समिती (पुणे), मैत्री, रेणू गावसकर (एकलव्य शिक्षण संस्था) आणि गणेश वेद पाठशाळा (रत्नागिरी) या संस्था (प्रत्येकी १० हजार रुपये)