नवलमल फिरोदिया
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
| नवलमल फिरोदिया | |
|---|---|
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
नवलमल कुंदनमल फिरोदिया यांचा जन्म अहमदनगर (अहिल्यानगर ) महाराष्ट्र येथे झाला. पेश्याने ते एक वकील होते तसेच ते एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून स्वतंत्र चळवळीत सक्रिय होते, स्वातंत्र्य पूर्व काळात त्यांनी त्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले व वकिलीची सुरुवात केली, परंतु त्यांचे मन त्यात रमत नव्हते म्हणून त्यांनी मुंबईत typewriter बनविणाऱ्या कंपनी मध्ये काम केले, पण त्यांच्या मनात देशप्रेम आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. ह्याच विचारातून त्यांनी एक मोटर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीला त्यांनी अहमदनगर जवळ एक छोटीशी कंपनी उभारली, त्यात कामगार ही त्यांचेच मित्र होते, आजच्या #force कंपनीची सुरुवात येथूनच झाली, अहमदनगर शहर हेच ह्या कंपनीचे जन्मस्थान!
आज जे तीन चाकी रिक्षा आपण जगभर पाहतो त्याचेही जन्मस्थान नगर शहराच आहे. श्री फिरोदया जी ह्यांना रिक्षा ची कल्पना हातगाडी कामगारांना गाडी ओढतांना बघून सुचली, ह्यातून त्यांनी टेम्पो (tempo) ह्या जर्मन कंपनीशी करार करून व बजाज कंपनी च्या भागीदारी मधून भारतात थ्री व्हिलर(3 wheeler) बनवन्यास सुरुवात केली. ह्यातूनच भारतात टेम्पो ची सुरुवात झाली.त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दल, तसेच मर्सडीज, bmw ह्यासारख्या नामंकित कंपन्या साठी सुद्धा काम केले. आजची force travellar, urbania, trax, gurkha, cruiser, matador etc ह्या काही ह्याच कंपनीच्या नामंकित गाड्या आहेत.