नवनाग स्तोत्र
Appearance
हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानले आहे. नवनाग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये नागांच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.
नवनाग स्तोत्र खालीलप्रमाणे आहे-
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभंच कंबलं | शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||
एतानि नव नामानी नागानांच महात्मनां| सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |
अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीय अशी नागांची नऊ नावे आहेत, असे या स्तोत्रात सांगितले आहे. तसेच या स्तोत्राच्या पठणाने भयाचा नाश होऊन विजय होतो, असे सांगितले आहे.