नरेंद्र करमरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरेंद्र कृष्ण करमरकर (१९५७; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे मराठी, भारतीय गणितज्ञ आहेत. ते करमरकर अल्गोरिदमासाठी प्रसिद्ध आहेत.

जीवन[संपादन]

करमरकरांचा जन्म १९५७ साली ग्वाल्हेरात झाला. त्यांनी इ.स. १९७८ साली भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथून विद्युत अभियांत्रिकी शाखेची बी.टेक पदवी मिळवली. पुढे त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून एम.एस., तर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवली.

न्यूजर्सी येथील बेल प्रयोगशाळेत काम करताना इ.स. १९८४ साली त्यांनी करमकर अल्गोरिदम म्हणून ख्यातनाम झालेला अल्गोरिदम मांडला. पुढे करमरकर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संशोधनसंस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले.

बाह्य दुवे[संपादन]