द सिनेमॅटिक इमॅजिनेशन
द सिनेमॅटिक इमॅजिनेशन (The Cinemtic Imagination : Indian Popular Films as Social History) हे भारतीय सिनेमांचा सामाजिक इतिहासाचा पुरावा म्हणून अभ्यास करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखिकेने सिनेमावर राष्ट्र ही संकल्पना कशा प्रकारे प्रभाव करते आणि त्याचबरोबर सिनेमा वेगवेगळ्याप्रकारे समाजातील गोष्टींची मांडणी कशाप्रकारे करतो याचा अभ्यास केलेला आहे. ज्या प्रकारे सिनेमातून आदर्श स्त्री घडवण्याचे काम केले जाते तसेच आदर्श मुलगा ,आदर्श आई , खलनायक, Social butterfly ,इतर आदर्श इतर प्रतिमा ही घडवल्या जातात. भारतीय सिनेमा विशेषतः हिंदी सिनेमा हा असामान्यपणे आणि अनपेक्षितपणे भिन्न संस्कृती एकत्र आणतो. प्राथमिक भूमिकेच्या पातळीवर देशाच्या विविध भागातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणतो त्यामुळे हिंदी सिनेमा हा एक देश म्हणून निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो आहे . लेखिकेने या पुस्तकामध्ये विषयावर लक्ष केंद्रित करताना मुख्य शीर्षकाद्वारे स्पष्ट केले आहे. "CINEMATIC IMAGINATION: INDIAN POPULAR FILMS AS SOCIAL HISTORY" म्हणजेच भारतातील लोकप्रिय सिनेमाचा अभ्यास सामाजिक इतिहास म्हणून केला आहे . लेखीकेने मांडल्याप्रमाणे सदरिल पुस्तकामध्ये , लेखिकेने नवनिर्मित राष्ट्राचा स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सिनेमाचा अभ्यास केला आहे. यात त्यांनी साधारणत: पाच दशकातील सिनेमाचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास करताना त्यांनी सामाजिक इतिहास पाहिला आहे. तसेच त्या त्या वेळेस असलेली राजकीय ,सामाजिक ,इ परिस्थिती यांचा संदर्भ घेऊन अभ्यास केला आहे.गेल्या दशकात अभ्यासक , संशोधक आणि विद्यार्थी हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून सिनेमांच्या अभ्यासाकडे वळले आहेत. हिंदी सिनेमा हा सामाजिक संघर्ष कुटुंबामध्ये आहे ,असे दाखवतो . धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, आणि जात विविध भेदभाव असलेल्या एक "भारतीय" राष्ट्र म्हणून कल्पना जपण्याची आणि "कुटुंब / राष्ट्र " म्हणून संकल्पनाची मांडणी पुन्हा पुन्हा सिनेमामधून करत असतात .लेखिका मांडतात कि, राष्ट्र, वर्ग, जात, आणि (धार्मिक) समुदाय "संस्थीकरण लैंगिक विषमतेच्या तीक्ष्ण उतरंडी वर " अवलंबून आहेत. हिंदी चित्रपटामध्ये कशाप्रकारे स्त्रीयांचा कर्तेपणा बाहेरील आणि घरातील जबाबदाऱ्या सक्षमरित्या पार पाडण्यात आहे अशी वातावरणनिर्मिती केली जाते , हेही त्या दाखवून देतात. लेखिका हिंदी सिनेमाचा विश्लेषण करताना सामाजिक इतिहास देखील अभ्यासतात . आदित्य चोप्रा यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेनेगे आणि मनोज कुमार यांच्या पूरब और पश्चिम 27 वर्षे निर्मितीतील फरक असलेले दोन चित्रपट सुंदर आहेत. जे भारतातील सामाजिक परिवर्तन दाखवितात . कुमार चित्रपट पश्चिमेकडील राष्ट्रांना तसेच बदलला सिनेमामध्ये विरोध करतो तर लंडन मध्ये भारतीय समुदाय चोप्रा सिनेमामध्ये पारंपारिक भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्त्य विनियोजन लक्ष केंद्रीत करतो. दोन्ही समान वितर्क बांधण्यात आहेत. पाश्चीमात्त्य दिशेने प्रतिकार चोप्रा चित्रपटात काही प्रमाणात मिसळून आले आहेत असे दिसते, तर पूरब और पश्चिम वेस्ट म्हणजे वाईट असा प्रभाव पडतो जो भारतीय संस्कृती घाण होईल ,याकडे पाहिले गेले आहे. अशा प्रकारे लेखीकीने भारतीय सिनेमांचा अभ्यास हा सामाजिक इतिहास म्हणून केलेला आहे . ज्यात त्यांनी विविध घटकाच्या सिनेमावरील परिणामाचा संदर्भ घेतला आहे .
राष्ट्र आणि त्याचे असमाधान
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील राष्ट्र आणि त्याचे असमाधान (Nation and Its Discontents ) या पहिल्या लेखात मांडतात कि , स्वातंत्र्य साजरे केलेले नवनिर्मित राष्टाचा आधुनिकीकरण प्रकल्पमध्ये तणाव सांगितला आहे .सिनेमाचे विश्लेषण करताना विशेषतः सरंजामशाही पद्धत आणि लोकशाही , आणि विकास प्रकल्प या विविध घटकामध्ये एक उत्सुक राष्ट म्हणून आले आहे . सिनेमावर काही काळ नेहरूवादी विचारप्रणालीचा ही प्रभाव पडलेला दिसून येतो . नवनिर्मित राष्ट्राची ओळख नागरिकांना यातून होतं तसेच राष्ट्र म्हणून भावना पण घडवली गेली .
आदर्श स्त्री
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील आदर्श स्त्री ( The Idealized Women ) या दुसऱ्या लेखात मांडतात कि , पाश्चिमात्त्य सर्व काही वाईट म्हणून अनेक गोष्टीना विरोध केला गेला आहे .गुरुदत्त यांच्या MR.& MRS.55 या सिनेमामध्ये एक समान नागरी कायद्याला चर्चा पासूनचा कालावधी पाहता येईल . सिनेमातील वाद हा हिंदू कोड बिल या संबंधातून पाहता येईल . MR.& MRS.55 या हिंदी चित्रपटाचा वापर हा "आदर्श भारतीय स्त्री ." म्हणून वेगळी वेगळी ओळख राष्ट्र आणि समाज साठी निर्माण केली जाते. या सिनेमामध्ये पुरुष आणि स्त्रियांना विविध गुण बाहेर पडले . यावर म्हणले गेले कि, विविध प्रकारे "राष्ट्र" साठी तसेच एक "आदर्श महिला " निर्मिती आणि भरणपोषण यातूनच होते म्हणून व्हिक्टोरियन मूल्ये आणि ब्राम्हण मुल्ये परत आलेले दिसतात या सर्वातून "आदर्श भारतीय स्त्री " ही प्रतिमा घडवली गेली.
नायक आणि खलनायक : राष्ट्राचे कथन करताना
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील नायक आणि खलनायक : राष्ट्राचे कथन करताना ( Heroes and Villains : Narrating the Nation ) या तिसऱ्या लेखात मांडतात कि ,सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात खलनायक हे राष्ट्रसाठी धोका आणि त्याच्या पुरुषत्वाची मांडणी करताना आले . त्यानंतर अनेक दशके पुरुषत्वाऐवजी आई-मुलगा संबंधला नायक-खलनायक लढाई समजून अनेक सिनेमा आले उदा . मदर इंडीया ,दिवार ,इ सिनेमाचा संदर्भ पाहता येईल. नायक हा देशासाठी लढणारा आहे आणि खलनायक हा देशद्रोही आहे . लेखिका असे मांडतात कि, हिंदी सिनेमा मध्ये जो कुटुंबविषयक कथने मांडण्यात आली . ज्यामध्ये मुलाचा बापावर होणारा विजय सिनेमाच्या शेवटी सुनिश्तित होताच .
नायिका , प्रणय आणि सामाजिक इतिहास
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील नायिका , प्रणय आणि सामाजिक इतिहास ( Heroine , Romance and Social History) या चौथ्या लेखात मांडतात कि,, स्त्री याचे आणि स्त्रीवादी संस्कृतीचे लोकप्रिय सिनेमात आणि पत्रकारितामध्ये जे प्रतिनिधित्व किंवा चित्रण हे सर्व अनिश्चित आणि अतिशय वाद पूर्ण आले आहे .
कामुकतेचे प्रदर्शन करणारे शरीर
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील कामुकतेचे प्रदर्शन करणारे शरीर (The Sexed Body )या पाचव्या लेखामध्ये मांडतात कि , सिनेमामध्ये अद्याप परिवर्तनवाद अर्थात परिवर्तन आले नव्हते . परंतु विशिष्ट काळात व्यावसायिक सिनेमा यायला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण सिनेमाचे स्वरूप बदलले. व्यावसायिक सिनेमाचा काळ सुरू झाल्यानंतर सिनेमामध्ये स्त्री यांचे शरीर हे कामुकतेचे प्रदर्शन करणारे , एक आकर्षण म्हणून दाखवले गेले . आराधना मध्ये राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर याचे केलेले चित्रण, नार्तीकी म्हणून केलेला स्त्री देहाचा वापर ( तिसरी मंझील ) , बलात्कार नायिकेवर (इन्साफ का ताराझू ) , इ कोणत्या स्त्री याच्या धर्तीवरील सिनेमामध्ये स्त्री देहाचा वापर हा कामुकतेचे प्रदर्शन करणारे,एक आकर्षण म्हणून दाखवले गेले .
प्रणयाचे पुन्हा वाचन
[संपादन]- लेखिका त्यांच्या पुस्तकातील प्रणयाचे पुन्हा वाचन (Re-Reading Romance )या सहाव्या लेखामध्ये मांडतात कि , सिनेमामध्ये काही चित्रपट अशा प्रकारे आहेत कि जे कुटुंब पुनर्वसन करणाऱ्या शैलीत आहेत . त्यांना आदरणीय अधिकार तो बहाल करण्यात आला आहे याप्रकारे अनेक शतके आपली भूमिका करत आहे . जेथे समाजामध्ये माध्यमातून सत्ता यांमधील शत्रुत्वाची आणि कधी कधी याचा अर्थ वाटाघाटी म्हणून त्याग सांगितला जातात . प्रेमापेक्षा कुटुंबला महत्त्व आहे ,हे मांडले जाते आणि बहुतेक वेळा कृती मध्ये गोंधळ होताना दिसतो . मैने प्यार किया आणि हम आपके हे कौन सारखे सिनेमा याचे उदा आहे . यामध्ये स्त्रीला त्यागाचे ,कुटुंबासाठी प्रेमाचा त्याग करणारी ,घालून दिलेले कायदे , नियम ,अटी जीवापाड जपणारी असते .[१]
इशिता सिंह रॉय
[संपादन]इशिता सिंह रॉय ह्या ज्योतिका विर्दी याच्या The Cinematic Imagination: Indian Popular Films as Social History ह्या पुस्तकाचा Book review लिहिताना मांडतात कि , ज्योतिका विर्दी ह्या The Cinematic Imagination ह्या आपल्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय हिंदी सिनेमाचा अभ्यास हा लोकप्रिय मजकूर म्हणून करतात . आणि उत्तरवसाहतवादाची संकल्पना मांडताना जो भारतीयपणा ( निओ) पाशात्त्य वसाहतवादाने प्रभावीत आहे . विर्दीचा टीकात्मक दृष्टिकोन हा उत्तरवसाहतवादी सिद्धांत दिसून येतो . विर्दीने म्हणणं मांडल आहे, त्यात ती केंद्र स्थानी भारतीय लोकप्रिय सिनेमाने काय केले याचा अभ्यास करते . उदा . " नवीन राष्ट्राची निर्मिती " [२]
Imagined Spaces: The implications of song and dance for Bollywood's diasporic communities
[संपादन]Imagined Spaces: The implications of song and dance for Bollywood's diasporic communities ह्या लेखामध्ये Kai-Ti Kao & Rebecca-Anne Do Rozario मांडताना त्यांनी ज्योतिका विर्दीच्या The Cinematic Imagination: Indian Popular Films as Social History पुस्तकाचा संदर्भ घेतलेला आहे . लेखक सदरील लेखामध्ये काल्पानिक जागांचा / अवकाशाचा बॉलीवूडच्या diasporic communities वर गाणे आणि नाच (dance ) याचा परिणामांचा अभ्यास केला आहे . लेखक मांडतात कि , ज्योतिका विर्दी त्याच्या पुस्तकात चर्चा करतात की, प्रेम कहाण्याची उत्क्रांती ही बॉलीवूड मध्ये भारतीय मुल्ये आणि राष्ट्रीयत्वच्या बदलत्या कलाने झालेली दिसते . (२००३,१७८-२०४) NRI हा महत्त्वाचा वर्ग भारतात मानला जातो . प्रेमाची सुरुवात आणि त्याची पूर्तता ही भारतात होताना दिसून येते . ज्यांचे भावनिक स्थान हे बदलले असले तरी ते केंद्रस्थानी परत आणण्याचे काम राष्ट्रीयत्वाशी बांधील राहण्यात येते (२०२) .जी भारतीय उत्कट भावना असलेल्या देशभक्तिपूर्ण पार्श्वसंगीताचा वापर केल्याने येते . भारतात विशेषतः हिंदी सिनेमा असामान्यपणे आणि आश्चर्यचकितरित्या भिन्न संस्कृती असलेल्या देशाच्या कल्पना , रचना एक प्राथमिक भूमिका म्हणून देशाच्या विविध भागातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणते . ही मांडणी एक देश म्हणून निर्मितीसाठी महत्त्वाची आहे .[३]
- ^ विर्दी,ज्योतिका(२००३)द सिनेमैटिक इमेजीनेशन.परमनंट ब्लैक
- ^ http://go.galegroup.com/ps/anonymous?id=GALE%7CA118377489&sid=googleScholar&v=2.1&it=r&linkaccess=fulltext&issn=01635069&p=AONE&sw=w&authCount=1&isAnonymousEntry=true
- ^ http://dx.doi.org/10.1080/10304310802001755