द व्हायोलन्स ऑफ नॉर्मल टाइम्स (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

द व्हायोलन्स ऑफ नॉर्मन टाइम्स[१] हे कल्पना कन्नबिरन यांनी संपादित केलेले पुस्तक काली फॉर विमेनशी संलग्नित विमेन अनलिमिटेड प्रेसने २००५ मध्ये प्रकाशित केले आहे.

ह्या ग्रंथातून स्त्रीवादी विश्वात होणाऱ्या महिलांवरील हिंसाचाराविषयी चर्चा आणि अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कायद्यावे दृष्टिकोन आणि सरकारी संस्थात्मक साधने यांना या अभिव्यक्तीला सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते.

प्रस्तावना[संपादन]

सन १९७० पूर्व काळापासून भारतामधील स्त्री हक्काविषयीचे चर्चाविश्व हे पोलिस कोठडीतील बलात्कार,त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार विशेषतः हुंड्याच्या संदर्भातील हिंसाचाराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित व्हायला लागले. १९८० ते १९९० च्या काळामध्ये विस्थापन, विशेषतः आदिवासी जमातीचे आणि जातिआधारित हिंसा, धार्मिक मूलतत्ववाद,आर्थिक उदारीकरण इत्यादी संदर्भातील हिंसेविषयीच्या समजेतील भारतीय स्त्रीवादी लेखनातील बारकावे मांडले गेले. या प्रक्रियेला मानवी हक्काच्या चर्चाविश्वाशी जोडून महिलांविरोधी हिंसाचार हा मानवी हक्काचा प्रश्न आहे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित व्हायला सुरुवात झाली.

संपूर्ण सामाजिक क्षेत्रातील महिलांविरोधी हिंसेच्या स्त्रीवादी समजेच्या विकासामध्ये या पुस्तकाचे महत्त्वाचे योगदान आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामधून वेगवेगळ्या भागांतील, वेगवेगळ्या ज्ञानशाखीय भूमिदृष्टीमधून हिंसाचाराचे पैलू अधोरेखित केले आहेत. या पुस्तकातील काही लेख हे दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर आधारित आहेत. न्याय व्यवस्था-पारंपरिक अधिकार ते आधुनिक न्यायालय,कौटुंबिक अवकाश, मानसिक अपंगत्व, महिलेसाठी घर हे एक आव्हान, असे मुद्दे घेऊन दैनंदिनी प्रश्नांपासून असामान्य घटनेपर्यंत या पुस्तकात मांडणी केली आहे.

सारांश लेखन[संपादन]

१. पहिल्या प्रकरणामध्ये वसुधा धागम्वर यांनी या निबंधातून भारतीय समाजातील स्त्रीयांविरोधातील हिंसाचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी भाष्य केले आहे.त्याचप्रमाणे देशातील वेगवेगळ्या प्रदेशामधील स्त्रीवादी विश्लेषण आणि स्त्रीवादी हस्तक्षेप,एकूण स्त्रीयांविरोधातील हिंसाचार आणि त्याची पुनर्निर्मिती याविषयी मांडणी केलेली आहे.

२. देव नाथन आणि गोविंद केळकर लिखित हा पेपर काही घटनांवर लक्ष केंद्रित करतो ज्या पुरुष वर्चस्वाच्या उभारणीच्या प्रक्रियेतील स्त्री व पुरुष यांच्या मधील संघर्षाचा पुरावा आहेत. व्यक्तीची संकल्पना मनातील वाईट गोष्टींचे स्त्री आणि पुरुष,समाज आणि समाजातील उतरंड यांच्या संबंधांचे प्रतिक आहे याचे विश्लेषण या पेपर मधून केलेले आहे.

३. पद्मिनी स्वामिनाथन यांनी ह्या पेपर मधून विशेषतः अशा महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्या आर्थिक हिंसाचाराच्या विशिष्ट अनुभवाला सामोरे जात असतात. लिंगभेदभावात्मक विकासातील हिंसाचाराच्या वाढत्या साहित्यामध्ये या पेपरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

४. राजेश्वरी सुन्दर राजन यांचा हा निबंध राज्यसंस्था,कुटुंब आणि समाज यांच्या मधील आंतरछेदीतेवर (intersection) आधारित आहे. त्याचबरोबर अपंगत्व हि स्वतः एक समस्या कशी ठरते या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करतो. हे संपूर्ण वास्तव लिंगभावात्मक आणि गंभीर आहे यावर देखील हा निबंध लक्ष केंद्रित करतो. लेखिका पुण्यामधील मतीमंद महिलांसाठी असणाऱ्या सरकारी हॉस्पिटल मधील 'गर्भाशय काढणे'(Hysterectomies) या महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित करते.

५. अंजली दवे यांनी ह्या पेपर मधून स्त्री चळवळी मधून स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराचे काही प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. हा पेपर ३ भागांमध्ये विभागाला आहे. १. समाजकार्य ज्ञानशाखा आणि त्याचे बदलते स्वरूप यांचा आढावा घेतला आहे . २. गुन्हेगारी न्यायात्मक व्यवस्था ते स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार आणि त्यांचे बदलते स्वरूप याविषयी परीक्षण केलेले आहे . ३. महिला आणि बालकांसाठीच्या विशिष्ट समिती संबंधीचे अनुभव या तिसऱ्या भागामध्ये सांगितले आहेत. जए एका बाजूला समाजकार्य या ज्ञानशाखेच्या सीमेमधून बदलताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला हिसाचार झालेल्या व्यक्तीला कार्यालयीन क्षमतेनुसार परिणामकारक मदत पुरवते.

योगदान[संपादन]

या पुस्तकाचा संदर्भ घेऊन कल्पना विश्वनाथ आणि सुरभी मह्रोत्रा यांनी 'Shall We go out ?Women's safety in Public Spaces in Delhi 'या लेखामध्ये महिलांविरोधी हिंसाचाराचे स्वरूप आणि समकालीन नागरी वातावरण याविषयी चर्चा केली आहे. या लेखामध्ये कल्पना विश्वनाथ आणि सुरभी मह्रोत्रा यांनी कल्पना कन्नबिरन यांच्या दि व्हायोलन्स ऑफ नॉर्मल टाइम्स या पुस्तकाचा संदर्भ घेतला असून त्यांनी 'दि व्हायोलन्स ऑफ नॉर्मल टाइम्स' याचीच व्याख्या केली आहे. महिलांवरील हिंसाचाराविषयी बोलताना व हिंसेचे परीक्षण करताना कश्याप्रकारे हक्क आणि उल्लंघन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे हे चर्चिले आहे. .

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Kannabiran Kalpana (Ed),The Violence of Normal Times,Women Unlimited,2005.