दीनबंधू (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उध्दार करण्यासाठी सुरु केले होते. महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरु केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत्र सुरु करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले.

इतिहास[संपादन]

दीनबंधू पत्राचे वैशिष्ट्य असे की, महाराष्ट्रात ज्या नवी जागृतीचा प्रवाह सुरु झाला होता त्याचे पाणी समाज्याच्या खालच्या थरापर्यंत बहुजन समजात फिरविण्याचे कार्य दीनबंधू पत्राने केले. हे वृतपत्र प्रत्यक्ष कृष्णराव भालेकर यांनी सुरु केले तरी त्याची प्रेरणा महात्मा ज्योतीराव फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीत होती. नवीन सरकारी कायदेकानून, दुष्काळाची आपत्ती इत्यादी आणि अनेक कारणांनी शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात सावकारांच्या घशात जाऊ लागल्या. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वैतागून महाराष्ट्रात ठिकाण आणि उठाव केले. त्यासंदर्भात लिहिताना दीनबंधूच्या २४ नोव्हेंबर १८७९ च्या अंकात शेतकऱ्यांच्या दुःख निवारण्याच्या कायद्याविरुद्ध ओरड केली आहे असे नोंद केली होती. [१]

पहिला अंक[संपादन]

कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत्र सुरु करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले.

पहिले संपादक मंडळ[संपादन]

दीनबंधू पत्राचे स्थलांतर मुंबईत झाल्यानतर नारायण मेघाजी लोखंडे त्याचे पहिले संपादक झाले.


संदर्भ[संपादन]

  1. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)