Jump to content

दिवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवड साप

दिवड हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सापाला विरोळा अथवा इरूळा असं देखील म्हणतात.प्रमाण भाषेत याला दिवड म्हणतात. दिवड म्हणजे Checkered Keelback हा साप पाण्यात अथवा पाण्याजवळ राहतो. दिवड हा पोहोण्यामध्ये तरबेज सर्प आहे. तो बिनविषारी साप आहे. रंगाने पिवळसर व गडद खाकी असतो. त्याच्या अंगावर बुद्धीबळातील पटाप्रमाणे काळे पट्टे असतात. लांबी तीन ते पाच फुट एवढी असते, डोके आकाराने लहान व डोळ्याची बाहुली गोल काळसर रंगाची असते. त्याच आवडते खाद्य म्हणजे मासे व छोटे बेडूक. इतर सापांच्या तुलनेत हा साप चपळ असतो. चपळ असल्याने पटकन चावतो.