दासरी नारायण राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दासरी नारायण राव
जन्म दासरी नारायण राव
४ मे १९४२ (1942-05-04)
पलाकोल्लू, पश्चिम गोदावरी आंध्र प्रदेश
मृत्यू ३० मे, २०१७ (वय ७५)
हैद्राबाद, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक,
भाषा तेलगू
पत्नी दासरी पद्मादासरी नारायण राव(जन्म ४ मे इ.स. १९४२. मृत्यू ३० मे इ.स. २०१७) हे प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि माजी कोळसा राज्यमंत्री होते. दासरी नारायण राव यांनी तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेतील १२५ पेक्षा अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी प्रेमाभिषेकम, मेघा संदेशाम, ओसे रामुलामा आणि टाटा मनावदु हे चित्रपट गाजले होते. राव यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी राव यांनी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर चरित्रपट बनवण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

दासरी नारायण राव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये कोळसा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र, कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.