दादा सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दादा सामंत इ.स. १९२९ - २२ मे, २०२०:बोरीवली, मुंबई, महाराष्ट्र) हे मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. डाॅ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होत.

१९८१ साली मुंबईत झालेल्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत युनियनमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. डाॅ. दत्ता सामंत यांची जानेवारी १९९७ मध्ये हत्या झाली. त्या हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळले.

दादा सामंत यांनी गळफास लावून आत्महत्या केली अशी बातमी आहे.[ संदर्भ हवा ]