Jump to content

दहावी पंचवार्षिक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • कालावधी - १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७
  • योजना खर्च - नियोजित खर्च =१५,२५,६३९ कोटी ₹
  • प्रत्यक्ष खर्च = १६,१८,४६० कोटी ₹

दहाव्या योजनेची लक्ष्ये

[संपादन]
  1. जी.डी.पी.च्या वाढीच्या दराचे लक्ष्य - प्रतिवर्ष ८ टक्के
  2. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण २००७ पर्यंत २१ टक्के तर २०१२ पर्यंत ११ टक्के पर्यंत कमी करणे.
  3. २००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर १६.२ टक्के पर्यंत कमी करणे.
  4. साक्षरतेचे प्रमाण २००७ पर्यंत ७५ टक्के पर्यंत तर २०१२ पर्यंत ८० टक्के पर्यंत वाढविणे.
  5. बालमृत्यू प्रमाण २००७ पर्यंत दर हजारी ४५ पर्यंत तर २०१२ पर्यंत दर हजारी २८ पर्यंत कमी करणे.
  6. माता मृत्यू प्रमाण २००७ पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे २ तर २०१२ पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे १ पर्यंत कमी करणे.