दबावगट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजकारण[संपादन]

दबावगट[संपादन]

निवडणुकांमध्ये उमेदवार उभे न करता आपल्या विशिष्ट हेतूंसाठी क्रियाशील असणाऱ्या समाजातील गटांना 'दबावगट' असे म्हणता येईल. हितसमूह आणि दबावगट या संज्ञांमधील अर्थच्छटा काहीशा भिन्न आहेत. हितरक्षणासाठी हितसमूह जेव्हा शासनावर किंवा प्रशासनावर दबाव टाकतात तेव्हा त्यांनी दबावगटाचे स्वरूप धारण केलेले असते. स्पष्ट औपचारिक संघटन नसणारे किंवा शासकीय धोरण प्रभावित करण्याचा प्रयत्न न करणारे गट ‘दबावगट’ या संज्ञेसाठी पात्र ठरत नाहीत.