दत्तात्रय नरहर बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दत्तात्रय नरहर बर्वे स्वातंत्र्यसैनिक या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तूकाका बरवे (बर्वे) यांचा जन्म  १४ सप्टेंबर १८९९  मध्ये कोठुरे या छोट्याशा गावी एक जहागिरदार घराण्यात झाला. ते दहा वर्षाचे असतांना त्यांच्या वाड्याची जहागिरी इंग्रज सरकारने खालसा केली. दत्तात्रय नरहर बरवे हे त्यांचे पूर्ण नाव होते. द्त्तुकाका हे सगळ्यात लहान होते. त्यांना दोन मोठे भाऊ आणि दोन बहिणी होत्या. दत्तुकाकांचे  प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत कोठुरे येथे झाले. पुढच्या शिक्षणाची सोय गावात नव्हती.म्हणून ते मुंबईला नातेवाईकांकडे गेले. एका वर्षात दोन इयत्ता अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतले.त्यात  एक विषय इंग्रजी होता. त्यांचे इंग्रजी खूप चांगले होते. शिकून डॉक्टर व्हावे व खेड्यात लोकांवर उपचार करावेत अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचे बंधू विनायक नरहर बरवे एल.एल.बी होवूनही त्यांना सनद मिळत नव्हती व त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मग आता शिकून काय करायचे? त्याऐवजी शेती करावी असा सल्ला वडीलधारी मंडळींनी दिला. पुण्या जवळील मांजरी फार्म येथील शेतकी शाळेत त्यांची रवानगी झाली. अश्या प्रकारे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले.

  शेतकी शाळेत ते गुरुजनांचे आवडते विद्यार्थी होते.त्यांनी शेतकी शाळेत मिळवलेल्या  ज्ञानाचा स्वतःच्या शेतात पुरेपूर वापर केला,आणि विविध प्रयोग केले. नुकसान झाले तरी चालेल १/२ एकरमध्ये प्रयोग करायचेच असे त्यांचे म्हणणे होते. पान मळा,पेरूचा बाग, लिंबोणीचा बाग, पपईची बाग,द्राक्ष, केळी बाग हे सर्व प्रयोग त्यांनी केले. बागायत क्षेत्र कमी व जिरायत जास्त त्यामुळे बाजरी, गहू,हरबरा, भुईमुग इत्यादींचे क्षेत्र मोठे असे. शेतीची सर्व कामे त्यांनी स्वतः मन लावून केली. नांगरणी,वखरणी त्याच प्रमाणे पेरणी देखिल ते चांगल्या पद्धतीने करीत. त्यांनी नारायण केळकर यांच्यासारख्या निष्णात वैद्याकडून वैद्यकीचे प्रशिक्षण घेतले. घरच्या घरी विविध औषधे तयार करण्यास ते शिकले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गावासाठी केला. तसेच द्त्तुकाकांनी बाराक्षर चिकित्सेचा अभ्यास केला. आजारी माणसांची सेवा केली. आजही घरात हानिमानचे होमिओपॅथीचे पुस्तक आहे.

  दत्तू काकांचे लग्न बडोदा येथील घाणेकर कुटुंबातील मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. सासरी ती सावित्री म्हणून ओळखली जावू लागली. लग्नाच्या आधी वधूवरांनी एकमेकांना पाहिलेही नव्हते.

  देशाला स्वातंत्र मिळायचे होते. त्यामुळे दत्तू काका सत्याग्रहात करत असे. त्यांना त्यासाठी कारावास भोगावा लागला होता.१९३० ते १९४० दरम्यान अनेक स्वातंत्र्य आंदोलने झाली.त्यात त्यांचा सहभाग असे. खूप लोक येत बैठका होत.त्यांच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था करावी लागे.गावात भास्कर पाटील ही सन्मानीय व्यक्ती होती. त्यांचा आणि द्त्तुकाकांचा विशेष स्नेह होता.दत्तू काका पक्के काँग्रेसवाले होते.१९४२ मध्ये महात्मा गांधीनी क़्विट इंडिया (चलेजाव चळवळ ) सुरू केली होती. ठिकठिकाणी सभा आयोजित केल्या गेल्या. प्रत्येक सभेत ब्रिटिशांनो चालते व्हा हे घोषवाक्य असे. त्यावेळेस जहाल कार्यकर्त्यांनी निफाडची कचेरी जाळण्याचे ठरवले होते. ते जेव्हा दत्तूकाकांना समजले,त्यावेळेस त्यांनी या गोष्टीला  तीव्र विरोध केला. आपल्याला शांततेने आंदोलन करायचे  आहे.गांधीजींनी असे सांगितलेले नाही.त्यांनी असे सांगून ते घडू दिले नाही. ‘ब्रिटिशांनो चालते व्हा’ची सभा निफाड येथे झाली होती,खूप समुदाय जमला होता.मुख्य वक्ते द्त्तुकाका होते. तिथे टॉमकिन नावाचा साहेब पोलिसांची फौज घेऊन हजर होता. सभा संपल्यावर त्याने द्त्तुकाकांच्या छातीवर बंदूक ठेवली व म्हणाला, “तुम्ही ब्रिटिशां विरुद्ध का लढता आहात?दुसरे महायुद्ध चालू आहे, ब्रिटिशांना सहकार्य करण्या ऐवजी तुम्ही त्यांच्या विरुद्ध का लढता आहात. उद्या जर हिटलर आला तर तो तुम्हांला गुलाम करेल.” छातीवर बंदूक असतांना देखिल न डगमगता दत्तूकाका म्हणाले, “आता तुमच्या राज्यात देखिल आम्ही गुलामच आहोत आणि उद्या हिटलर आला तर काय करायचे ते आम्ही पाहून घेवू. त्याची काळजी तुम्ही करू नका. प्रथम तुम्ही आमच्या भूमीतून चालते व्हा.” याचा टॉमकिनला खूप राग आला व त्याच क्षणी त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्या दिवशी घरी जाण्याची परवानगी दिली. ते दहा पोलिसांसमवेत घरी आले. गावातल्या लोकांना खूप वाईट वाटले. दुसरे दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर पत्नीला सांगितले, “मी देशासाठी तुरुंगात जात आहे, तू मुलांची काळजी घे व इतर गोष्टींचा सांभाळ कर.” जाण्याआधी गावात सगळ्यांना जाऊन भेटले.ते कधीच चहा पित नसत.पण त्या दिवशी कोणी चहा दिला की त्यांनी लगेच पिऊन टाकला.त्यावेळेस गावातले सगळेजण त्यांना एक किलोमीटर पर्यंत निरोप द्यायला आले होते. निफाडहून पुढे त्यांची रवानगी येरवड्याला झाली.  

   तुरुंगात भाकरी कच्चा असायच्या अशी सर्वांची ओरड होती.मग द्त्तुकाका तिथल्या मुख्य अधिकाऱ्याला भेटले व वस्तुस्थिती सांगितली.तिथलं काम मागून घेतलं.

  जेलमध्ये काही स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकातले होते,गुजरात मधले होते.गुजरात मधले मेघवृत्त व्यास हे होते. त्यांचा योगाभ्यास होता. त्यांचेकडून त्यांनी योगाचे व योगासनाचे धडे घेतले. द्त्तुकाकांना उत्तम मलखांब करत असत.त्यांनी आपल्या मुलांना देखिल मलखांब शिकवला होता.ते तुरुंगात गुजराथी,कन्नड शिकले. तसेच काथ्यापासून सुंदळ माळा बनवणारे होते.ही ही कला त्यांनी अवगत केली.

  १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.त्यानंतरही शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. निफाड येथे अनेकांच्या मदतीने शाळा सुरू केली. त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिकवले.

  त्यांनी सार्वजनिक कामेही चालू केली.लासलगाव येथील मार्केट कमिटीचे पहिले चेरमन द्त्तुकाका होते.पुढे यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहाने  द्त्तुकाका बर्वे यांना  स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन  त्यांच्या मृत्युच्या दोन वर्षे आधी सुरू झाली.पण त्यांनी त्या रकमेला कधीही हात लावला नाही,तो पैसा त्यांनी प्रपंचासाठी वापरला नाही.पुढे त्यांच्या मुलांनी तो पैसा विविध शिक्षण संस्थांना देणगी म्हणून दिला. हळूहळू द्त्तुकाकांना विस्मरण होवू लागले. ४ फेब्रुवारी १९७७ रोजी या स्वातंत्र्य सैनिकाची प्राणज्योत मालवली.