Jump to content

दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण अजमेर हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. सदर मतदारसंघ हा अजमेर राज्यात १९५६ पर्यंत होता. तदनंतर हा मतदारासंघ राजस्थान राज्याचा भाग झाला.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • अजमेर उपविभाग : रामसार महसुल मंडळ व नसिराबाद छावणी
  • बेवाड उपविभाग
  • केकरी उपविभाग

दक्षिण अजमेर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
अजमेर राज्य (१९५२-१९५६)
१९५२ मुकट बिहारीलाल भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त
१९५७ नंतर पहा: अजमेर लोकसभा मतदारसंघ

निवडणूक निकाल

[संपादन]

१९५२ लोकसभा निवडणूक

[संपादन]
१९५२ लोकसभा निवडणूक : दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुकट बिहारीलाल भार्गव ४३,०८२ ५२.६५% ‌−
भारतीय कम्युनिस्ट पक्ष कुमारानंद २५,१२८ ३०.७१% ‌−
अखिल भारतीय राम राज्य परिषद मदन सिंह १३,६२४ १६.६५% ‌−
बहुमत १७,९५४
झालेले मतदान ८१,८३४ ४८.९६%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर