Jump to content

थॉमस अँड फ्रेंड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थॉमस अँड फ्रेंड्स ही एक लहान मुलांची ब्रिटिश दूरचित्रवाणी मालिका आहे जी रेव्हरंड डब्ल्यू. ऑड्री आणि ब्रिट ऑलक्रॉफ्ट यांनी तयार केली आहे. या मालिकेचा आरंभ 'ITV' वर ९ ऑक्टोबर १९८४ रोजी झाला आणि २० जानेवारी २०२१ रोजी 'चॅनल ५' वर त्याचा समारोप झाला. या मालिकेचे 'थॉमस द टँक इंजिन अँड फ्रेंड्स', 'थॉमस द टँक इंजिन', 'थॉमस अँड फ्रेंड्स: बिग वर्ल्ड! बिग ॲडव्हेंचर्स!' अशी नावे बदलत गेली होती. रेव्हरंड डब्ल्यू. ऑड्री आणि नंतर त्याचा मुलगा क्रिस्टोफर यांच्या 'द रेल्वे सिरिज' कथांवर आधारित ही धारवाहिक आहे. यात 'थॉमस' नावाचे एक काल्पनिक पात्र असते जे काल्पनिक नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर, एडवर्ड, हेन्री, गॉर्डन, जेम्स, पर्सी आणि टोबी नावाच्या रेल्वे इंजिन आणि इतर वाहनांसोबत कार्यरत राहाते.