थेट विक्री प्रतिनिधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थेट विक्री प्रतिनिधी हे उत्पादकांच्या वतीने थेट ग्राहकांना माल किंवा सेवा विकणारे प्रतिनिधी असतात.

बँक[संपादन]

बँकांनी आपल्या सेवा तसेच विविध आर्थिक उत्पादने ग्राहकांना विपणीत करण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना 'थेट विक्री प्रतिनिधी ' असे संबोधले जाते.

थेट विक्री प्रतिनिधी हे बँकेचे पगारी कर्मचारी नसतात पण बँकेच्या उत्पादनाचे विक्री करण्याचे तसेच बँकेला नवे ग्राहक मिळवून देण्याचे अधिकार थेट विक्री प्रतिनिधीना असतात.

या कामाबद्दल थेट विक्री प्रतिनिधीना काही ठराविक रक्कम (उदा. विपणीत केलेल्या प्रत्येक खात्यामागे ठराविक रक्कम) अथवा टक्केवारी (उदा प्रत्येक कर्जाच्या काही टक्के )नुसार मोबदला दिला जातो.

कामे[संपादन]

१) बँकेच्या सेवा तसेच विविध उत्पादनाची जाहिरात करणे.

२) नवीन ग्राहकांचे ' आपल्या ग्राहकास ओळखा' (इंग्लिश : KYC) कागदपत्र गोळा करून बँकेला देणे.

३) ग्राहकाच्या खरेपणाची खात्री करून घेणे.

४) ग्राहकाचे कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे धारिणीत लावून बँकेला सदर करणे.

५) कर्जाचे वितरण सुरळीत व्हावे म्हणून ग्राहक तसेच बँकेमध्ये मध्यस्थाचे काम करणे.