Jump to content

थियरायझिंग पेट्रिआर्की (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थियरायझिंग पेट्रीआर्की (पुस्तक) या पानावरून पुनर्निर्देशित)

थियरायझिंग पेट्रीआर्की हे पुस्तक [] ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ सिलविया वालबी द्वारा लिहिलेले असून ऑक्सफ़र्ड द्वारे १९९० मध्ये प्रकाशित झाले आहे.

मुख्य युक्तिवाद व पुस्तकाची संरचना

[संपादन]

या पुस्तकात लेखिका समकालीन ब्रिटिश समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाची कारणं मांडू पाहतात. लिंगभावाच्या संबंधांमध्ये झालेल्या अलीकडील बदलांना समजण्यासाठी त्या एक विशिष्ट दृष्टीकोन स्वीकारण्याचे समर्थन करतात . वालबी यांच्या मते लिंगभाव विषमतेचे प्रभावी विश्लेषण करण्यासाठी पितृसत्ता ही संकल्पना केंद्रस्थानी आणणे गरजेचे आहे. हे पुस्तक ८ प्रकरणांमध्ये संघटीत केलेले आहे. पहिल्या प्रकरणात प्रस्तावना असून, पुढील ६ प्रकरण लिंगभाव विषमतेच्या विविध क्षेत्रांवर भर देतात व शेवटच्या प्रकरणात लेखिका लिंगभाव समानतेच्या स्वरूपांमध्ये वेगळ्या बदलांना, स्त्रियांच्या स्थानात होणाऱ्या प्रगती बाबतीतील धारणांपासून वेगळ करण्याची गरज मांडतात.

सारांश

[संपादन]

पहिल्या प्रकरणात लेखिका स्त्रीवादाच्या ४ मुख्य सैद्धांतिक प्रवाहाचा (जहाल स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद व द्विप्रणाली सिद्धांत (dual system theory) आराखडा मांडतात. तसेच या सिद्धांतांची गुंतागुंत मांडणारे किंवा टीका करणाऱ्या वादविवाद जसे कि वर्ग, वंश, लिंगभाव, आवशकतावाद किंवा उत्तराधुनिकतेवरील चर्चेचे विश्लेषण करतात. या प्रकरणात पितृसत्ता व त्यांच्या विविध स्वरूपावर सुद्धा चर्चा केलेली दिसून येते.

२ऱ्या प्रकरणात पगारी रोजगारावर चर्चा केलेली आहे. स्त्री पुरुषांमधील पगारात असलेले अंतर, कामाचे स्वरूप व प्रमाण सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर येथे चर्चा केलेली आहे.

तिसऱ्या प्रकरणात घरगुती उत्पादन संबंधांवर भाष्य केलेले आहे. वाल्बी या कटाक्षाने 'घरगुती' व 'कुटुंब' यामधील फरक दाखवून घरगुती उत्पादन संबंधांचे परीक्षण करतात.

४थे प्रकरण हे संस्कृतीमध्ये लिंगभावाची अभिव्यक्ती याबाबत भाष्य करते. येथे लेखकांनी लिंगभावात्मक व्याक्तीनिष्ठ्तेचे ३ दृष्टीकोन (सामाजिकीकरणाचा सिद्धांत , मनोविश्लेषणात्मक सिद्धांत व चर्चाविश्वाचे विश्लेषण (discourse analysis) मांडलेले आहे.

लैंगिकतेच्या भुमिकेबद्दल महत्त्वाचे प्रश्न ५व्या प्रकरणात विचारलेले आहेत. त्याकडे आनंदाने साधन म्हणून बघावे कि पुरुषांचे स्त्रियांवर असलेले नियंत्रणाचे आधार म्हणून बघावे किंवा सामाजिक विषमतेचे विश्लेषण करताना त्याचा विचार क्वचितच करण्याची गरज आहे, असे प्रश्न त्या या प्रकरणात विचारतात.

६व्या प्रकरणात स्त्रियांच्या विरुद्ध पुरुषी हिंसेकडे लेखिका लक्ष वेधतात. त्यांच्या मते हिंसा ही एक सामाजिक रचना असून पितृसत्तेच्या बाहेत त्याला समजून घेत येणार नाही.

प्रकरण ७ मध्ये लिंगभाव व राज्य यांच्या संबंधांकडे पाहिलेले दिसते. त्यांच्या मते राज्याला एक पितृसत्ताक संरचना म्हणून पाहणे जरी आकर्षक वाटले तरीही राज्याच्या पितृसत्ताक काळाच्या अभिव्यक्तीमध्ये कसे बदल झाले हे बघण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे.

प्रकरण ८ मध्ये लेखक पूर्वीच्या स्त्रीवाद्यांचे संघर्ष व त्यांच्या विजयानंतर पितृसत्तेने कसे आपले स्वरूप बदलले हे दाखवून देतात. त्यांच्या मते सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात स्त्रियांच्या शोषणाचे नवीन प्रकार निर्माण होतील अशा पद्धतीने पितृसत्ता अभिव्यक्त झाली/ पुढे आली[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Walby, Sylvia (1990). Theorizing Patriarchy (इंग्रजी भाषेत). Basil Blackwell. ISBN 9780631147688.
  2. ^ "Theorizing Patriarchy". Wiley.com (इंग्रजी भाषेत). 1991-01-08. 2018-04-01 रोजी पाहिले.