Jump to content

थापट्या बदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोव्हेलर
Spatula clypeata

थापट्या किंवा परी बदक हिवाळ्यात भारतात स्थलांतर करणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येतात. या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Southern Shoveller असे म्हणतात. तर मराठीत परी, सरग्या व हिंदी मध्ये खातिया हंस, खोखार, घिराह, तीदारी, तोकरवाला, पुनन, सानखार, असे म्हणतात.

ओळख : हा पक्षी बदकापेक्षा मोठा असतो. या पक्ष्याचे डोके व मान चमकदार काळपट हिरवी असून छातीचा रंग पांढरा शुभ्र आहे. बाकीचा खालील भाग तांबूस आहे. पंखांचा पुढचा भाग पिवळसर निळा आसतो.त्यामध्ये पांढरी पट्टी. पाखीवर हिरवा पट्टा आसतो. मादीच्या अंगावर गडद उदी व बदामी रंगाचे ठिपके असतात. पंख करडे निळे रंगाचे असून त्यावर हिरवी पट्टी असते. थापी सारखी रुंद चोच ठळक नारंगी रंगाची असते. पाय नारंगी रंगाचे असतात.

हे पक्षी जास्तीत जास्त भारत ,श्रीलंका आणि मालदीव बेटात हिवाळी पाहुणे असतात. हे पक्षी आर्कीटक प्रदेशात देखील आढळतात. सरोवरे आणि झिलाणी येथील उथळ पाण्यात यांचा वावर असतो.

किडे, अळ्या, जंत, लहान बेडूक, शंख शिंपले, लहान मासे आणि सर्व प्रकारच्या बिया आणि पाण्यातील गवतांचे अंकुर इत्यादी त्यांचे खाद्य असते.