थाई विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बोधचिहन

थाई विकिपीडिया ही थाई भाषेतील मुक्त ज्ञानकोशाची आवृत्ती आहे. २५डिसेंबर २०१३रोजी याची सुरूवात झाली.१३४,००० लेख यामधे असून ३७१३६३ नोंदणीकृत सदस्य आहेत. या विकिपिडियाला सर्व विकीपीडियांमधे तेराव्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे.

विशेष[संपादन]

३१ जानेवारी २००६ रोजी इंग्रजी विकिपीडियाच्या जोडीने थाई विकिपिडियाचा उल्लेख झाला.२००७ साली Thai Wikipedia and Communicating Knowledge to the Public या विषयावर पदवीसाठी अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याने छुलालोंगकोर्न विद्यापीठातून प्रबंध सादर केला. २००५-२००६च्या दरम्यान थायलंड मधे झालेल्या राजकीय आणिबाणीच्या काळात तेथील स्थानिक नेत्याने स्थानिक ज्ञानकोशातील एक लेख वाचण्याचे सुचविले.


Thai Junior Encyclopedia Project या प्रकल्पाखालोखाल दुसर्‍या क्रमांकाचे स्थान थाई ज्ञानकोशाने प्राप्त केले आहे.[१]

लेख[संपादन]

२८ फेब्रुवारी २००४ रोजी प्रकाशित झालेला संगणक विज्ञान (วิทยาการคอมพิวเตอร์) हा या ज्ञानकोशातील प्रथम लेख आहे.

हॅरी पाॅटर (แฮร์รี่ พอตเตอร์) हा या ज्ञानकोशातील एक हजारावा लेख आहे.


नंद -बुद्धाचा पिता (พระนันทะ) हा या ज्ञानकोशातील पन्नास हजारावा लेख आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Alexa - Top Sites in Thailand - Alexa". www.alexa.com. 2021-01-10 रोजी पाहिले.