त्रिक्रम
Appearance
क्रीडाप्रकारांमध्ये सामन्यादरम्यान कोणतीही सकारात्मक कामगिरी सलग तीन वेळा करणे; तसेच सामान्यतः कोणतीही गोष्ट सलग तीन वेळा करणे म्हणजे त्रिक्रम (इंग्रजी हॅट-ट्रिक / हॅट्रिक ) होय. सन १८५८ मध्ये ऑल-इंग्लंड इलेवन कडून खेळताना हीथफिल्ड स्टिफन्सन या गोलंदाजाने सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद केले होते. हीथफिल्ड व्यावसायिक खेळाडू असल्याने त्या वेळच्या प्रथेप्रमाणे या पराक्रमाबद्दल त्याच्यासाठी निधी जमविण्यात आला आणि त्याला एक हॅट (गोल टोपी) भेट देण्यात आली.[१] मुद्रणामध्ये ही संज्ञा सर्वप्रथम सन १८७८ मध्ये ऑस्ट्रेलियातील द स्पोर्ट्समन या नियतकालिकाने फ्रेड्रिक स्पोफ्फोर्थ या गोलंदाजाच्या कामगिरीच्या वर्णनासाठी वापरली. [२]
कालांतराने इतर खेळांमध्येही ही संज्ञा वापरण्यात येऊ लागली.