तेल्हारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तेल्हारा
जिल्हा अकोला
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १८९०६
२००१
दूरध्वनी संकेतांक ०७२५८
टपाल संकेतांक ४४४१०८
वाहन संकेतांक महा 30


तेल्हारा

हे छोटेसे गाव अकोला ह्या जिल्हा ठिकाणाहून वायव्येला तालुका म्हणून आहे. गावातली जमीन तापी-पूर्णा खोऱ्यातील, म्हणून काळी व कसदार जमीन येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू.

गावात शिवाजी महाविद्यालय नावाचे कॉलेज आहे. शिवाय, शेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी ही प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवते. तेल्हारा या शहरापासून ८ कि.मी. अंतरावर भांबेरी या गावी विवेक विद्या मंदिर ही शाळा व तिच्याच विज्ञान शाखेचे कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय आहे. कला व वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रमासाठी गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. गावात हल्ली शिक्षण पदविका(डी.एड) व (बी.एड) शिक्षण पदवी हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू झाले आहेत.

गावच्या बाहेर दत्तवाडीला दत्ताचे एक देऊळ आहे. येथे दर दत्तजयंतीला यात्रा भरते.

गावातून एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पूर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मध्यात आणि गावाच्या दक्षिणेकडे गौतमेश्वराचे देऊळ आहे. तेथील शिवलिंग फार पुरातन आहे. गावातील लटीयाल भवानी मंदिर(भवानी पेठ) विठ्ठल मंदिर(मुख्य पेठ), दुर्गादेवी (प्रताप चौक), मारोती मंदिर (कसबा), गजानन महाराज मंदिर (वान प्रकल्प), महानुभाव पंथी कृष्ण मंदिर ( गाडेगाव रस्ता) वगैरे प्रसिद्ध आहेत.

[[वर्ग:अकोला जिल्ह्यातील तालुके अकोट | अकोला तालुका | तेल्हारा | पातूर | बार्शीटाकळी | बाळापूर | मुर्तीजापूर ]]