तृणमुळे (राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन संकल्पना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(इंग्रजी Grassroots, मराठी रूढ शब्द तळागाळातील प्रजा, रयत, रयात). सर्वसामान्य रयतेतून त्यांच्याचकरिता चालवली जाणाऱ्या संघटनेला आणि चळवळीला तृणमूल चळवळ असे म्हणतात. अश्या संघटनांचा आणि चळवळींचा उपयोग मुख्यत्वे समाजकारणासाठी व राजकारणासाठी होतो. या संकल्पनांना राज्यशास्त्रात, लोकप्रशासनशास्त्रात व व्यवस्थापनशास्त्रात खालून-वर जाणारी पद्धत (बॉटम-टू-टॉप अप्रोच), आणि विपणनशास्त्रात बॉटम ऑफ द पिरॅमिड टु टॉप असे म्हणतात. या पद्धतीत एखादी गोष्ट मोजक्या अभिजनांनी करण्यापेक्षा अधिकाधिक जनसमुदायास सामावून घेऊन उद्दिष्टपूर्तीचा प्रयत्न केला जातो.

काहीवेळा अभिजनांमध्ये अथवा उच्चशिक्षित मर्यादित वर्गात उपलब्ध असलेली क्षमता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीही या संकल्पनेचा उपयोग होताना दिसतो.