तूर द फ्रांस
Jump to navigation
Jump to search
टूर दे फ्रान्स (फ्रेंच: Le Tour de France) ही युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत आहे. दरवर्षी जुलै महिन्यात साधारण ३ आठवडे चालणाऱ्या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो. ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शॉंज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो.
१९०३ सालापासून चालू असलेली ही शर्यत अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्रॉंगने विक्रमी ७वेळा जिंकली आहे.