तुंगुस्का स्फोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुंगस्का स्फोट हा रशियाच्या क्रास्नोयार्स्क क्रायमधील स्टोनी तुंगुस्का नदीजवळ झालेला मोठा स्फोट होता. ३० जून, इ.स. १९०८च्या सकाळी झालेल्या या स्फोटात २,१५० किमी प्रदेशातील जंगल भुईसपाट झाले होते. सुमारे ८ कोटी झाडे यात पडली असल्याचा अंदाज आहे. अतिविरळ मानवी वस्ती असलेल्या प्रदेशात ही घटना घडल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

हा स्फोट उल्काघातामुळे झाल्याचे समजले जाते परंतु उल्का जमिनीपर्यंत पोचल्याचे दिसत नाही. अंदाजे ५ ते १० किमी उंचीवर उल्केचा स्फोट होउन ही घटना घडल्याचा समज आहे.