तणाव
तणाव (Stress) (किंवा ताण, ताण-तणाव) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय.[१] मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.
सध्याच्याकाळात ताण ही सर्वाना अनुभवी लागणारी बाब झाली आहे.फारच थोड्या व्यक्ती ताणाचे चागल्या प्रकारे व व्यस्थापन करताना दिसतात.
ताणाशी योग्य प्रकारे जुळवूनण घेता आल्यामुळे जीवनातिल आनंद, स्वास्थ हरवलेल्या वत्कीची सांख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आरोग्याचाकिरकोळ तरकारी किवा गंभीर आजारया स्वरूपातअनेक व्यक्ती ताणाची किमत मोजताना दिसतात.या शिवाय ताणामुळे मद्यपान, धूम्रपान,अमलीपदार्थ सेवनया सारख्या समस्या उद्भवतात . ताणाचा कोटेबिक स्वस्थ यावर परिणाम होतो.त्याची परिणीती असमाधानकरक समाधाण होताना दिसते. अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.
लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.
कारणे
[संपादन]तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात. बाह्य कारणे व आंतरिक कारणे
- बाह्य - एकूण तणावनिर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ ५-१० टक्के एवढाच वाटा असतो.
- उदा. कामाच्या ठिकाणचे व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.
- आंतरिक – एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा ९०-९५ टक्के वाटा असतो. आक जीवन प्रणालीमुळे तणाव निर्माण होतो असे म्हणले जाते; परंतु कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरूप त्या परिस्थितीकडे पहाण्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर सर्व अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे नेहमीची परिस्थितीदेखील कशी तणाव निर्माण करू शकते, याची काही उदाहरणे खाली आहेत.
- आत्मविश्वासाचा अभाव - आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली, की व्यक्ती
तणावग्रस्त होते.
- हळवेपणा - रस्त्यात भेटलेला मित्र बघून हसला नाही म्हणून तणाव.
- लाजणे - अपरिचित व्यक्तीशी बोलताना तणाव.
- न्यूनगंड असणे - आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात तणाव.
दुष्परिणाम
[संपादन]तणावाच्या दुष्परिणामांची दोन गटात विभागणी करता येते.
- शारीरिक - पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.
- मानसिक - लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.
उपाययोजना
[संपादन]तणावावर सर्वसाधारणपणे दोन स्तरावर उपाययोजना केल्या जातात -
- शारीरिक स्तरावर उपाय - उदा. झोपी जाणे, कामावरून सुट्टी घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, व्यायाम करणे इत्यादी. यात केवळ कृतीच्या स्तरावर उपाय असल्यामुळे सुधारणा अगदी तात्पुरतीच असते. बऱ्याच वेळा तणावपूर्ण परिस्थितीपासून पूर्णतः बाजूला जाणे शक्य नसते, तसेच एका ठिकाणावरून दुसरीकडे गेल्यास तिथेही ताण निर्माण होऊ शकतो.
- मानसिक स्तरावर उपाय - मानसोपचार उपचार इत्यादी. यात केवळ कृतींच्या स्तरावरच नव्हे तर ज्यापासून कृतींचा उगम होतो त्या विचारांच्या स्तरावर उपचार केले जातात. त्यामुळे काही काळ सुधारणा टिकू शकते म्हणून हे उपाय हे कायम स्वरूपी उपाय नाहीत.
परिणाम
[संपादन]तणावामुळे पित्त वाढणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, दमा, रक्तदाब, मधुमेह इ. विकार होऊ शकतात. तसेच अति राग येणे, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, कशातच रस न वाटणे, सतत दुःखी रहाणे असे मानसिक त्रास होऊ शकतात. तणावग्रस्त व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही, स्वतः आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही.
तणाव कोणालाही नको असतो, म्हणून तो दूर करण्याचे विविध प्रयत्न माणूस करतो. झोप घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, मानसोपचारतज्ञांकडे जाणे इ. उपाय आपण करतो पण त्यांचा उपाय थोडा काळ टिकतो व नंतर पुन्हा माणूस तणावग्रस्त होतो. काही जण तणाव दूर करण्यासाठी सिगारेट, दारु यांसारख्या व्यसनांचा आधार घेतात परंतु त्याचा अंमल असे पर्यंतच ताण दूर झाल्यासारखे वाटते. नंतर ताण पुन्हा येतो. त्यामुळे हे उपाय बाह्य असून वरवरचे आहेत असे लक्षात येते.
उपचार
[संपादन]समस्या केंद्रित तंत्र
- सम्बद्धीकरण
- विनोद
- सकारात्मक पुनर्मुल्यांकन
- परोपकारिता
- आत्मपरीक्षण
मानसिक अवरोध / अस्वीकृती तंत्र
- मानसिक स्थानांतरण
- मनप्रवरुत्ति दडपून टाकणे
- हद्दबंदी
- युक्तीकरण
- श्रमपरिहार
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "तणाव म्हणजे काय, त्याची विविध कारणे, दुष्परिणाम, त्यावरील कायमस्वरूपी उपाय | mr.upakram.org". mr.upakram.org. 2018-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-22 रोजी पाहिले.