तणाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव (Stress) असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो. Vodka Vodka Vodka Vodka Putin!!!

१. डोकेदुखी
अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते. कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे. कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात.
२. थकवा
काही न करता थकवा जाणवणे किंवा काही न करण्याची इच्छा होणे.
३. स्नायूंमधील ताठरता
हातांच्या आणि पायांच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह कमी होणे म्हणजेच ताठरता येणे.
४. अनावश्यक काळजी ,असुरक्षितता आणि भीती
५. खिन्नता
खिन्नता : खिन्नता ही अशी भावना आहे ज्यामध्ये व्यक्तीला असा भास होतो कि तो कोणत्यातरी गोष्टीला मुकतो आहे.आशावेळी व्यक्तीला थोड्या किंवा अधिक वेळासाठी असाह्य मानसिक वेदना होतात.या वेदना नंतर शारीरिक वेदेनेत परिवर्तित होऊ शकतात.सहसा अश्या व्यक्ती सवांद साधतांनी हळूहळू बोलायला लागतात,तसेच त्यांच्या शारीरिक हालचाली हळुवार होतात.खिन्नता आल्यावर व्यक्तीला जेवण कमी जाणे,अति जास्त राग येणे,कशाची तरी चिन्ता होणे, भीती वाटणे हि खिन्नते काही मानसिक लक्षणे आहेत. तसेच डोके दुखणे,पाठीत दुखणे,पोटात दुखणे,मालाविरोध होणे,कामेच्छा कमी होणे असेही काही शारीरिक लक्षणे आहेत.
६. कमी किंवा जास्त रक्तदाब
अचानक रक्तदाब कमी किंवा जास्त होणे.
७. झोप न येणे
शरीर थकलेल असूनसुद्धा झोप न येणे हेही मानसिक तणावाच लक्षण आहे.याला इंग्रजी मध्ये इन्सोमनिया (insomnia) असेही म्हणतात .

कारणे[संपादन]

१. आरोग्य
२. भावनिक
३. नातेसंबंध
४. सामाजिक स्थिती
५. आजुबाजूची परिस्थिती
६. कामाचा ताण

उपचार[संपादन]

समस्या केंद्रित तंत्र

 १. सम्बद्धीकरण
 २. विनोद 
 ३. सकारात्मक पुनर्मुल्यांकन 
 ४. परोपकारिता
 ५. आत्मपरीक्षण 

मानसिक अवरोध / अस्वीकृती तंत्र

 १. मानसिक स्थानांतरण
 २. मनप्रवरुत्ति दडपून टाकणे
 ३. हद्दबंदी
 ४. युक्तीकरण
 ५. श्रमपरिहार