तांबडापांढरा रस्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांबडापांढरा रस्सा हा पदार्थ दोन वेग वेगळ्या रंगाच्या रस्स्यांपासून बनतो. हे दोन वेगळे वेगळे रस्से त्यांच्या नावा प्रमाणेच लाल (तांबडा) आणि पांढरा रंगाचे असतात. हे कोल्हापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहेत. हे शक्यतो मांसाहारी (मटण किंवा कोंबडी) असतात. काहीजण त्यात भाज्या टाकून फक्त शाकाहारी तांबडापांढरा रस्सा सुद्धा बनवतात. पाहूणे घरी आल्यावर मुख्य मेजवानीला सुरुवात होण्याआधी ‘स्टार्टर’ म्हणून या या दोन्ही रश्शांना मोठी पसंती असते. त्यातही पांढरा रस्सा खास करून सूप सारखा पितात. पांढरा रस्सा बनवन्यासाठी बेस म्हनून मटण शिजवतानाचे पाणी वापरतात. तर तांबडा रस्सा बनवताना लाल तिखट जास्त वापरतात. दोन्ही रस्स्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तिखटपणा असतो.