तांत्रिक विश्लेषण (रोखेबाजार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तांत्रिक विश्लेषण (इंग्रजी :Technical analysis) अर्थशास्त्रात,रोखे बाजारातील समभाग,वायदे आणि संबंधीत जोखीमांच्या अभ्यासास किंवा विश्लेषणास तांत्रिक विश्लेषण ह्या नावाने संबोधतात.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर समभागांच्या भविष्यातील भावासंबंधीत उतार चढाव वर्तवता येतात किंवा त्यांचे अनुमान लावता येतात.त्यासाठी अशा समभागांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान बाजारभावांचा,त्यांच्या प्रमाणाचा,खरेदी-विक्रीच्या गुणोत्तराचा संदर्भ घेण्यात येतो.

तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय ?

तांत्रिक विश्लेषण म्हणजे बाजारातील भूतकाळातील माहिती , प्रामुख्याने किंमत आणि व्हॉल्युम ( VOLUME )  यांच्या अभ्यासानुसार वर्तमान आणि भविष्यातील किमतीच्या चढ - उताराचे पूर्वानुमान करण्यासाठीची एक विश्लेषण पद्धत. यामध्ये मार्केटने किंवा एखाद्या विशिष्ट स्टॉक / शेअर ने भूतकाळात कसे वर्तन केले यावरून आत्ताच्या परिस्थिती मधे किंवा येणाऱ्या भविष्यात ते कश्याप्रकारे वाटचाल करू शकतात याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून छोटया किंवा दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करू शकता. तांत्रिक विश्लेषण हे शेअर च्या किमतीवर काम करते ना की मूलभूत विश्लेषणा सारखे  कंपनीच्या अंतर्गत  मूल्यावर त्यामुळे यामधे शेअर ची चाल लवकर लक्षात येते.