तस्लिमा अख्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तस्लिमा अख्तर
Taslima Akhter at a Wikimedia Bangladesh event (May, 2019).
जन्म 1974 (age अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"
ढाका
राष्ट्रीयत्व बांगलादेशी
शिक्षण ढाका विद्यापीठ
पेशा कार्यकर्ता आणि छायाचित्रकार
प्रसिद्ध कामे अंतिम आलिंगन
संकेतस्थळ
taslimaakhter.com

तस्लिमा अख्तर (जन्म १९७४) या एक बांगलादेशी कार्यकर्त्या आणि छायाचित्रकार आहेत. त्या ढाका विद्यापीठाच्या पदवीधर आहेत, तसेच फोटोग्राफी स्कूल पाठशाळा याच्या देखील पदवीधर आहेत. त्या अनेक कार्यकर्ता संघटनांच्या सदस्या आहेत. २०१३ मध्ये राणा प्लाझा कोसळल्याचे प्रकरणात त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन मरण पावलेल्या एका महिलेचा आणि पुरुषाचा फोटो काढला होता. हा फोटो या घटनेचे प्रतीक बनला होता.

चरित्र[संपादन]

तस्लिमा अख्तरचा जन्म बांगलादेशातील ढाका येथे १९७४ मध्ये झाला.[१] तस्लिमा अख्तर ढाका विद्यापीठाची पदवीधर आहे, विज्ञान आणि सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतला आह. [२] विद्यापीठात असताना, ती बांगलादेश स्टुडंट्स फेडरेशनची सदस्य होती. ती पाठशाला,[२] ढाका येथील फोटोग्राफी स्कूलमध्ये फोटोजर्नालिझमच्या अभ्यासक्रमासाठी गेली. या संस्थेची स्थापना शाहिदुल आलमने केली.[३] बांगलादेशातील २००८ च्या राजकीय आणीबाणीच्या काळात तिला खुप अनुभव मिळाला. या अनुभवाचा वापर तिने फोटोग्राफीद्वारे सामाजिक आणि पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केला.[२] स.न. २०१२ मध्ये तस्रीन गारमेंट्स फॅक्टरीला लागलेल्या आगीचे दस्तऐवजीकरण करणाऱ्यांमध्ये तस्लिमा अख्तर यांचा समावेश होता.[२] तस्लिमा अख्तर यांनी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये तसेच भारतातील नंदीग्राममधील प्रकल्पांवर काम केले आहे.[२] तिच्या कार्यामुळे तिला २०१० मध्ये मॅग्नम फाउंडेशन शिष्यवृत्ती मिळाली.[१] तिचे काम अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाले आहे.[१]

तस्लिमा अख्तर या महिला संघटना बिप्लोबी नारी संघटना आणि वामपंथी कार्यकर्ता गट गण संघटना आंदोलनाच्या सदस्या आहेत.[३] त्या गारमेंट्स श्रमिक संघटनेची (गारमेंट कामगार संघटना) समन्वयक देखील आहेत.[१] [२] याव्यतिरिक्त, त्या पाठशाला येथे शिकवतात.[३] तस्लिमा अख्तरच्या राजकारणाचा तिच्या फोटोग्राफीवर प्रभाव दिसून येतो.[३]

महत्त्वाची कामे[संपादन]

एप्रिल २०१३ मध्ये राणा प्लाझा कोसळल्यानंतर पाठशाळेतील तस्लिमा अख्तर आणि इतर छायाचित्रकारांनी बचाव कार्यात भाग घेताना[३] तेथे मृत्यू पावलेल्या लोकांच्या जीवनाचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न केला.[२] या कथा नंतर चोबिश एप्रिल: हजार प्राणेर चितकर (२४ एप्रिल: हजार आत्म्यांचा आक्रोश) या नावाने पुस्तक म्हणून प्रकाशित करण्यात आल्या.[३] हे प्रकाशन गारमेंट कामगार संघटनेसोबत तस्लिमा अख्तर यांच्या कार्याशी संबंधित होते.[२] या प्रक्रियेदरम्यान, तस्लिमा अख्तर यांनी इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पुरुष आणि महिलेचे फोटो काढले. या फोटोत ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते.[४] तस्लिमा अख्तर यांनी खूप प्रयत्न करूनही छायाचित्रातील विषय ओळखू शकले नाहीत.[५] [६] हा फोटो विविध नावांनी ओळखला जातो, उदा, "सनातन मिठी"[४] "एक हजार स्वप्नांच्या मृत्यू"[७] आणि "अंतिम मिठी".[८] या फोटोला अनेक पुरस्कार मिळाले. या अपघातात ११०० लोक मरण पावले होते.[४] या छायाचित्राला ऑनलाईनही मोठ्या प्रमाणावर बघण्यात आले. यामुळे कपड्यांच्या कंपन्यांना उच्च किमान वेतन आणि सुधारित सुरक्षा मानकांची मागणी करण्याची याचिका झाली.[४] तस्लिमा अख्तर यांनी स्वतःला छायाचित्राने पछाडलेले असल्याचे सांगितले.[४] [५]

पुरस्कार[संपादन]

  • ज्युलिया मार्गारेट कॅमेरॉन पुरस्कार, द लाइफ अँड स्ट्रगल ऑफ गारमेंट वर्कर्स (२०१०) या डॉक्युमेंटरीसाठीच्या फोटोग्राफीसाठी तिसरे पारितोषिक.[१]
  • टाइम मासिकाचे "२०१३ चे सर्वोत्तम १० फोटोज" "अंतिम आलिंगन" (२०१३)[१][९]
  • चीनमधील ५व्या डाली आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (२०१३).[१]
  • "स्पॉट न्यूझ" श्रेणीतील वर्ल्ड प्रेस फोटो स्पर्धा, २०१४[१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f g "Taslima Akhter". World Press Photo. 4 November 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h Hossain, Anika (23 August 2014). "Activism Through Photography". dailystar.net. 4 November 2016 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f Prashad, Vijay (12 October 2015). "Workers' yarns". Himal magazine.Prashad, Vijay (12 October 2015). "Workers' yarns". Himal magazine.
  4. ^ a b c d e Roy, Sourav (31 May 2013). "Why the 'Eternal Embrace' Photograph From Bangladesh Haunts Its Photographer the Most". Huffington Post. 4 November 2016 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Haunting Dhaka disaster picture: A last embrace after clothes factor collapse that killed 950". Mirror.co.uk. 10 May 2013. 4 November 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Pollack, Kira (2 December 2013). "TIME Picks the Top 10 Photos of 2013". Time magazine. 4 November 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "Photography Oxford festival 2014". The Guardian. 27 September 2014. 4 November 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Rana Plaza images win World Press Photo". bdnews24.com. 4 November 2016 रोजी पाहिले.
  9. ^ Kira Pollack, "TIME Picks the Top 10 Photos of 2013" Time (magazine), Accessed 16 November 2016
  10. ^ "2014 Photo Contest". World Press Photo. 4 November 2016 रोजी पाहिले.