तवारिख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तवारिखा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे. यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात.

इस्लामपूर्व-काळातील अरबी जमातींचा लिखित व अलिखित इतिहास दंतकथांनी भरलेला असे. हदीस म्हणजे इस्लामी स्मृतीशास्त्रांच्या नियमांनुसार इतिहासलेखनात ‘इस्नाद’ म्हणजे अनेक पुरावे दिले जात. तवारिखा या लेखनप्रकाराने ऐतिहासिक काळातील घडामोडीना महत्त्व आले आणि अरबी लेखनात अधिक विश्वासार्हता आली. अनेक बखरी या तवारिखांवर आधारित असल्याचे आढळते. तवारिख हा लेखनप्रकार फार्सी भाषेतही आढळून येतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]