तन्वी मुंडले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तन्वी प्रकाश मुंडले (जन्म ९ मार्च कुडाळ, महाराष्ट्र) ही मराठी अभिनेत्री आहे तिला पाहिले नं मी तुला या दूरदर्शन मालिकेत मानसीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.[१]२०२१ मध्ये तिला झी मराठी पुरस्कारांमध्ये वामन हरी पेठे विशेष पुरस्कार मिळाला.[२][३][४]

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

तन्वीचा जन्म कुडाळ शहरात (जि. सिंधुदुर्ग)झाला होता. तिने प्राथमिक शिक्षण ललित कला केंद्रातून केले. तिने मुंबईच्या युनिव्हर्सिटीमधून बी.एस्सी मध्ये पदवी पूर्ण केली

कारकीर्द[संपादन]

तन्वीने २०१८ मध्ये सायकल या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०२१ साली पाहिले नं मी तुला मध्ये ती दिसली होती. झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या मालिकेत तिने मानसीची भूमिका साकारली होती.[५][६]

फिल्मोग्राफी[संपादन]

  1. सायकल २०१८
  2. पाहिले नं मी तुला २०२१
  3. कलरफुल २०२१

बाह्य दुवे[संपादन]

तन्वी मुंडले आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ World, Republic. "Tanvi Mundle: Here's where you have seen the 'Pahile Na Mi Tula' actor before". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Tanvi Mundle: I hope every festival would be celebrated responsibly from now onwards | Marathi Movie News - Times of India". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Shashank Ketkar misses his wife Priyanka Ketkar as he's away from her for shoot; dedicates a romantic song - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.
  4. ^ author/online-lokmat (2021-05-03). "मानसीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज | Tanvi Mundle Bold Look | Pahile Na Mi Tula Serial | Lokmat Filmy". Lokmat. 2021-05-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Chala Hawa Yeu Dya: Pahile Na Me Tula's Shashank Ketkar, Aashay Kulkarni, Tanvi Mundle Unravel Secrets!". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2021-04-12. 2021-05-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Tanvi Mundle: I hope every festival would be celebrated responsibly from now onwards | Marathi Movie News - Times of India". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.