ढोकळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ढोकळा

ढोकळा हा एक शाकाहारी खाद्यपदार्थ आहे. हा मुख्यत: गुजरातमध्ये तयार झाला. यात हरबरा दाळीचे पीठ आंबवून तयार केला जातो.

      २० मिनिटामध्ये तयार होणारा ढोकळा........
  

साहित्य:- १ वाटी बेसन पीठ,३ चमचे साखर,मिरची,मोहोरी,कडीपत्ता,मीठ,३ लिंबू चा रस ,पाणी,तेल,कोथिंबीर,जिरे, पावचमचा सोडा इत्यादी.

कृती:- प्रथम ३ लिंबाचा रस गळून घ्यावा.नंतर थोड्या पाण्यामध्ये ३ चमचे साखर विरघळून घ्यावे. १ वाटी बेसनपीठ एका पातेल्यात घेणे त्यामध्ये वरील लिंबाचा रस, साखर पाणी टाकून मिश्रण एकजीव करावे,त्यामध्ये मीठ चवीनुसार टाकावे. मिश्रण पातळ होण्यासाठी अवशाक्तेनुसार पाणी टाकावे व एकजीव करावे. नंतर त्यामध्ये पावचामचा सोडा टाकावा.व ते मिश्रण एकजीव करावे.कुकरच्या भांड्याला तेल लाऊन ते मिश्रण टाकावे.नंतर कुकर मध्ये दोन ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ते मिश्रण ठेवावे. कुकार्र्च्या टोप्नाची शिट्टी कडून मोठ्या ग्यासवर २० मिनिटे ठेवावे. नंतर कुकर थंड केल्यावर त्याला एका डिश मध्ये काढावे. फोडणी पत्रात तेल टाकून त्यामध्ये मोहोरी, जिरे,कडीपत्ता,मिरची टाकून वरून पसरवावे. त्याचे छोटे काप करुन, त्यावर कोथिंबीर पसरवावी.व साखरेच्रे पाणी सर्व बाजूने पसरवावे. व गरमागरम खाण्यसाठी तयार.

टीप:- सॉस किवा चिंचेची चटणी सोबत खावे..