ढगफुटी
Appearance
(ढगफूटी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.[१]
गुणधर्म
[संपादन]सर्वसाधारणपणे, प्रतितास १॰॰ मिलीमीटर (३.९ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते.
नोंदी
[संपादन]कालावधी | पर्जन्यमान | ठिकाण | दिनांक |
---|---|---|---|
१ मिनिट | १.९ इंच (४८.२६ मिमी) | लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत | ६ ऑगस्ट, २०१० |
१ मिनिट | १.५ इंच (३८.१० मिमी) | बारोट, हिमाचल प्रदेश, भारत | २६ नोव्हेंबर, १९७० |
५ मिनिटे | २.४३ इंच (६१.७२ मिमी) | पोर्ट बेल्स, पनामा | २९ नोव्हेंबर, १९११ |
१५ मिनिटे | ७.८ इंच (१९८.१२ मिमी) | प्लंब पॉइंट, जमैका | १२ मे, १९१६ |
२० मिनिटे | ८.१ इंच (२०५.७४ मिमी) | कर्टिया-डी-अर्गेस, रोमानिया | ७ जुलै, १९४७ |
४० मिनिटे | ९.२५ इंच (२३४.९५ मिमी) | गुइना, व्हर्जीनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | २४ ऑगस्ट, १९०६ |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत