डॉन बज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन डॉनल्ड डॉन बज (१३ जून, इ.स. १९१५:ओकलंड, कॅलिफोर्निया - २६ जानेवारी, इ.स. २०००:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू होता. ग्रॅंड स्लॅम जिंकणारा बज हा पहिला खेळाडू होता. हा एकूण पाच वर्षे जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू होता.