डेव्हिड कोलमन हेडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड कोलमन हेडली (इंग्लिश: David Coleman Headley) ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी (३० जून, इ.स. १९६०; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका - हयात) हा लष्कर-ए-तैयबा [१], तसेच त्याच्या दाव्यांनुसार पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी [२], यांनी आखलेल्या इ.स. २००८चे मुंबईवरील हल्ले घडवून आणण्याच्या कारस्थानांत सामील झालेला, मूळचा शिकागोचा राहणारा, पाकिस्तानी-अमेरिकन व्यक्ती आहे.

इ.स. २००८ सालातील मुंबई हल्ल्यांमधील सहभाग[संपादन]

हेडली तसेच दाऊद गिलानी या नावानेही कार्यरत असणाऱ्या या दहशतवाद्याने मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात महत्तवाची भुमिका बजावली. हेडली मूळ पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असुन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारी वेळी तो अमेरिकन व्यावसायिक पारपत्र ( पासपोर्ट) घेऊनच भारतात फिरत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय , पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्कर ए तोयबा आणि अमेरिकन गुप्तचर संस्था या तिघांसाठी तो एकाच वेळी काम करत होता. त्याच्यावर डबल एजंट म्हणुन अमेरिकेला फसवल्याचा संरक्षण तन्यांचा अंदाज आहे. परंतु नुकत्याच झालेल्या शिकागो घटल्यात त्याने अमेरिकन न्यायालयात सोबत करार केल्याने त्यामागील संपुर्ण सत्य समजने अवघड आहे.

हेडलीहा पाकिस्तानी वडिल सद सलीम गिलानी व अमेरिकन आई सेरिल हेडली या दाम्पत्याचा मुलगा. त्याचा जन्म ३० जून १९६० ला वॉशिंग्टनला झाला. सद सलीम गिलानी हे अमेरिकेतील एका रेडिओ स्टेशनमध्ये निवेदक होते. डेव्हिडच्या जन्मानंतर गिलानी व सेरिल पाकिस्तानात गेले. तेथे दोघांचा घटस्फोट झाला आणि सेरिल एकटीच अमेरिकेत परतली व डेव्हिड त्याच्या वडिलांजवळच पाकिस्तानत राहिला.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. "टेरर सस्पेक्ट लाइकली टू चेंज प्ली (दहशतवादातील आरोपी अर्ज बदलणार)", न्यू यॉर्क टाइम्स, १६ मार्च, इ.स. २०१०. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर) १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  2. "यू.एस. सिटिझन चार्ज्ड विथ कॉन्स्पायरिंग टू एड टेररिस्ट्स इन २००८ मुंबई अटॅक (अमेरिकन नागरिकावर मुंबईतील इ.स. २००८च्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप)", द वॉशिंग्टन पोस्ट, ८ डिसेंबर, इ.स. २००९. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर) १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.