डेल्फी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डेल्फी हे ग्रीसच्या फोकीस प्रांतात पार्नेसस पर्वताच्या नैर्ऋत्येकडील एका खोल खडकाळ घळीत असलेले ठिकाण आहे. ग्रीक मिथकशास्त्रात उल्लेख असलेल्या या ठिकाणाचे पूर्वीचे नाव पीथॉ होते. पायथॉन हा अग्निसर्प या स्थानाचा संरक्षक होता. त्याला ठार मारून अपोलोने हे स्थळ आपले केले.

प्राचीन काळी येथे पृथ्वीमातेचे एक मंदिर होते. या देवळात शंकूच्या आकाराचा एक मोठा दगड होता. त्याला पृथ्वीचे केंद्र वा हृदय म्हटले जाई.