Jump to content

डीट्रॉइट नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेट्रॉईट नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

डीट्रॉइट नदी अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील छोटी नदी आहे. ४४ किमी लांबीची ही नदी सेंट क्लेर सरोवरात उगम पावून ईरी सरोवरास मिळते. या नदीच्या पश्चिमेस अमेरिकेतील डीट्रॉइट शहर तर पूर्वेस कॅनडातील विंडसर शहर आहेत.

या नदीची रुंदी ८०० मीटर ते ४.०२ किमी असून सर्वाधिक खोली १६ मीटर आहे. आपल्या ४४ किमीच्या प्रवाहात डीट्रॉइट नदी समुद्रसपाटीपासून १७५ मीटर उंचीवरून १७४ मीटर म्हणजे फक्त १ मीटर खाली येते.