हॉटस्टार ही एक स्टार इंडियाची सहाय्यक कंपनी, नोवी डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या मालकीची एक भारतीय ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या सेवेमध्ये दोन पेड सबस्क्रिप्शन टायर्स देण्यात आल्या आहेत- त्यामध्ये एक देशांतर्गत कार्यक्रम आणि क्रीडा सामग्रीवर लक्ष केंद्रित करते (इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटसह) आणि प्रीमियम आंतरराष्ट्रीय चित्रपट व दूरदर्शन मालिका (एचबीओ व शोटाइम मूळ मालिकेसह असलेले दुसरे "प्रीमियम" स्तर. मार्च २०२० पर्यंत, हॉटस्टारचे कमीतकमी ३०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.[१]