Jump to content

डिजिलॉकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डिजिलॉकर ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे.ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाली.[] या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे.[] ही भंडारण जागा आधार या सेवेशी जोडलेली आहे.प्रत्येक नागरिकास/सदस्यास यात सुमारे १जीबी इतकी जागा मिळते.याचे सुरुवातीचे वेळेस ही जागा १०एमबी इतकी होती.

ही जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसार, तेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरू झालेली नाही. एकदा ती तशी झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न झाल्यावर, सदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेल, आपले अनेक दस्तऐवज हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.

यात दुसरी सोय अशीही आहे की, नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.

याचे संकेतस्थळावर, सदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता येते.पर्याय म्हणून, विपत्राद्वारे किंवा आधार क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [मिडियानामा भारत सरकारने दस्तऐवजांसाठी ई-लॉकर सेवा विमोचित केली] Check |url= value (सहाय्य)
  2. ^ [एकॉनॉमिक टाईम्स डिजिटल भारत कार्यक्रम:भारत सरकारने 'डिजिटल लॉकरची' बीटा आवृत्ती काढली] Check |url= value (सहाय्य)