डिकेमाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

  • संस्कृत- नाडीहिंगु; गुजराथी,हिंदी- डिकामाली; कन्नड- डिक्कामल्लि; तेलगु- गेरिबिक्की; तामिल- कुंबै शास्त्रीय नाव- Gardenia gummifera
  • वर्णन - डिकेमालीचे मोठे वृक्ष असतात व ते डोंगराळ प्रदेशांत होतात. हा वृक्ष पेरूच्या झाडासारखा दिसतो. पाने पेरूच्या पानांसारखी, फळ तोंडल्याएवढे व पेरूसारखे; बीजकोश एकखोलीचा व त्यात पुष्कळ बिया असतात. फांदीच्या डेखावर गोंद असतो. तो काढून जमा करतात. ह्या गोंदास डिकेमाली असे म्हणतात. डिकेमाली एक जातीचा गोंद आहे व त्याचा रंग हिरवड पिवळा असून त्यास बोक्याच्या मूत्रासारखा वास येतो. हा निर्भेळ असल्यास ओलसर राहून तकाकतो. ह्यात नेहमी बहुतेक भेसळ केलेलली असते.म्हणून सुका दिसतो. निर्भेळ डिकेमालीचे चूर्ण होण्यास कठीण पडते. औषधात निर्भेळ डिकेमाली वापरावी.
  • धर्म- डिकेमाली संकोचविकासप्रतिबंधक, कोष्ठवातप्रशमन,कृमिघ्न, नियतकालिकज्वरनाशक, स्वेदजनन, श्लेष्मनिस्सारक आणि त्वग्दोषहर आहे.
  • उपयोग- डिकेमाली हिवतापात प्रयोजक औषधाबरोबर देतात. त्याचा उद्देश अंगातील कापरे कमी करणे हा होय.आंतड्याच्या रोगात डिकेमालीची क्रिया उत्तम घडून येते. हिने आतड्यातील वायु नाहीसा होतो.पीडा कमी होते. जंत पडतात. गोल जंत पडण्यास हे उत्तम औषध आहे. मुलांना दात येताना ज्वर येऊन जुलाब व उलट्या होतात.अशा स्थितीत डिकेमाली फार गुणावह आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]