डब्बा एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डब्बा एक्सप्रेस (किंवा डबा एक्सप्रेस) हा एक भारतीय खेळ आहे. त्याला महराष्ट्रातील काही भागात "डबा ऐसपैस" किंवा फक्त "ऐसपैस" असेही म्हणतात. हा खेळ लपाछपी प्रमाणे खेळला जातो. यामध्ये एका खेळाडूला लपलेल्या इतर खेळाडूंना शोधायचे असते. इतर खेळाडूंना शोधणाऱ्या खेळाडूवर राज्य आहे असे म्हणतात. यामध्ये मोकळ्या जागी किंवा मैदनात मध्यभागी एक रिंगण आखले जाते. राज्य नसलेल्यांपैकी एक खेळाडू एखादा डबा रिंगणापासून लांब फेकतो. राज्य असलेला खेळाडू डबा घेऊन येऊन रिंगणात परत ठेवेपर्यंत इतर खेळाडू लपतात. राज्य असेल त्याने इतर खेळाडूंना शोधून आऊट करायचे. लपलेल्या खेळाडूंपैकी कोणी पळत येऊन डबा रिंगणातून उडवला, तर परत राज्य त्याच खेळाडूवर येते. जर लपलेले सगळे खेळाडू आऊट झाले, तर पहिल्या आऊट झालेल्या खेळाडूवर राज्य येते. या खेळाच्या नियमांमध्ये प्रदेशानुसार थोडाफार बदल आढळून येतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]