डबल्यु. आर. १०२ के.ए.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डबल्यु. आर. १॒॒०२ के.ए., किंवा पियोनी तारा, हा एक वोल्फ-रायेट तारा आहे. हा तारा मिल्की वे ह्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक आहे. त्याहून अधिक तेजस्वी एक तारा, डबल्यु. आर. २५ हा सर्वात तेजस्वी ताऱ्यांच्या श्रेणीत आघाडीवर असण्याची शक्यता आहे. एता कारिनी, हा १९ व्या शतकात तेजस्वी ताऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावरील तारा पियोनी ताऱ्याहून थोडा जास्त तेजस्वी आहे, पण तो एक दुहेरी तारा आहे. अलीकडील काळात पिस्तोल नावाचा ताऱ्याचा सुद्धा शोध लागला आहे, जो पियोनी ताऱ्याशी जास्त प्रमाणात समान आहे. [१]

पियोनी तारा हा गॅलॅक्टिक सेंटरजवळ असल्यामुळे, तो जास्त अंतरावर, व त्या दोघांपैकी जास्त अस्पष्ट आहे, व देखणीमधील तरंगलांबीमध्ये पूर्ण अस्पष्ट आहे. त्यामुळे, त्याला पाहण्यासाठी मोठ्या तरंगलांबीच्या अवर लाल प्रकाशाची गरज असते, जो धुळेच्या आतून प्रवेश करतो. स्पिटझर स्पेस टेलिस्कोपने पियोनी ताऱ्याला ३.६ मायक्रोमिटर, ८ मायक्रोमिटर व २४ मायक्रोमिटर, ह्या तरंग लांबीवर २० एप्रील २००५ साली पाहिलं. जर्मनीतील पाॅट्सडॅम महाविद्यालयातील एल. ओस्कीनोवा, डब्ल्यु. आर. हमन्न, आणि ए. बार्निस्क, ह्या लोकांनी केले.

पियोनी तारा ह्या पहिले, टू मायक्राॅन आॅल स्काय सर्वेने, जवळील अवर लाल पट्ट्यांमधील, १.२ मायक्रोमिटर, १.५८ मायक्रोमिटर, २.२ मायक्रोमिटर तरंगलांबीमध्ये पाहण्यात आला होता.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Wolf-Rainer Hamann; Andreas Barniske; Adriane Liermann; et al. (2011). "The most luminous stars in the Galaxy and the Magellanic Clouds". Société Royale des Sciences de Liège. 80: 98. arXiv:1012.1875v1. Bibcode:2011BSRSL..80...98H.