डुकाट
Appearance
(डकट या पानावरून पुनर्निर्देशित)
डुकाट तथा डकट हे युरोपमध्ये १४व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत चलनात असलेले नाणे होते. याचे अनेक प्रकार होते व त्यांतील सर्वाधिक प्रचलित नाणे व्हेनिसचे होते. १२८४पासून पाडल्या गेलेल्या या नाण्याला सेक्विन असेही नाव होते. यात ३.५ ग्रॅम किंवा ०.११ ट्रॉय औंस सोने होते. हे ९८.६% शुद्ध होते. हे नाणे अनेक शतके आंतरराष्ट्रीय व्यापारात वापरले गेले. डुकाटची नाणी फिरेंझेचे फ्लोरिन आणि ब्रिटनच्या पाउंड स्टर्लिंग यांच्याबरोबर चलनात होती.