Jump to content

ट्विटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ट्वीटर या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्विटर
ट्विटर
उपलब्ध भाषा बहुभाषिक
दुवा http://www.twitter.com/
अनावरण १५ जुलै २००६
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन

ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे.

ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. संकेतस्थळ, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एसच्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते.

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषतः युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक २८० शब्दांची मर्यादा आहे.

ट्विटर


उपयोग[संपादन]

ट्विटरचे वापरकर्ते वेगवेळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात. वेब ब्राउझरने संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यावत करता येते. त्याशिवाय ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब ॲप्लिकेशन्स) प्रयोगही करता येतात. जगभरात अनेक लोक एका तासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यावत करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेत, कारण अनेक लोकांना या अत्याधिक संयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीला) सतत आपल्याशी संबंधित ताज्या सूचना देणे कटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवेचे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए.

ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिकाेध्ये २००८ च्या राष्ट्रपति निवडणुकांत दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्ते आम जनतेपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून पोहचले. हेइक्रोब्लॉगिंग विख्यात व्यक्तीनाही आकर्षित करत आहे. म्हणून ब्लॉग अड्डाने अमिताभ बच्चनच्या ब्लॉगनंतर त्यांच्या साठीची माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा सुरू केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे इच्छुक बराक ओबामा पण ट्विटरवर असतात.. शशी थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीही साईटवर दिसतात. पूर्वी ही सेवा इंग्रजीमध्येच उपलब्ध होती, नंतर ती अन्य भाषांतही उपलब्ध झाली आहे. ती स्पॅनिश, जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इटालियन भाषा आता येथे उपलब्ध आहेत.

रँकिंग्स :

ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.

ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षणकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगने ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पण काही असुरक्षितताच्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका आठवड्यात दोनदा फिशिंग स्कैम च्यात आले. या मुळे ट्विटर द्वारा उपयोक्ताला सावधानतेचा इशारा देण्यात आला की ते डायरेक्ट मेसेज वर या कोणत्याही संदिग्ध लिंकला क्लिक करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि पासवर्ड इत्यादीची चोरी करतात त्यांच्या द्वारे उपयोक्ताला ट्विटर वर आपल्या मित्रांकडून डायरेक्ट मेसेजच्या आत छोटेसे लिंक मिळते त्या वर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या संकेतस्थळ वर पोहोचतो. हे एकदम ट्विटरच्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोक्ताला आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हणटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटरच्या मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकार ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता, डेविड कैमरन ने आपल्या ट्विटर वर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर मित्रांच्या यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कैम दुनियेतील इंटरनेट पर्यंत पोहोचले. सुरक्षा विशेषज्ञा अनुसार साइबर अपराधी चोरलेली सत्रारंभ माहितीचा प्रयोग बाकीच्या खात्याला ही हैक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूरच्या कंप्यूटर मध्ये जपून ठेवली असलेली माहितीला हैक करू शकतात.

या पासून वाचण्यासाठी उपयोक्तांना आपले खात्याचे पासवर्ड कोणते तरी कठिन शब्द ठेवून ठेवायला हवे आणि सर्व दूर एकच पासवर्डचा प्रयोग करू नये. जर एखाद्याला जर हे कळाले की त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध संदेश पाठवले जाते तर आपल्या पासवर्डला लगेच बदलने महत्त्वाचे आहे. असेच आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया पण तपासा.जर तिकडे कोणत्या थर्ड पार्टीची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला एक्सेस करण्यासाठी परवानगी देऊ नये.

ट्विटर ने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या रूपात प्रयोग होणारे ३७० शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या बद्दल अनुमान लावणे सोपे आहे . टेलीग्राफच्या रिपोर्ट अनुसार, ट्विटर ने '12345' आणि 'Password' जसे शब्दाचे पासवर्डच्या रूपात प्रयोगला थांबवले. याचा अंदाज लावणे अत्यंत सोपे होते मग उपयोक्ताच्या माहितीला धोका असू शकतो. पासवर्डच्या रूप 'पॉर्शे' आणि'फेरारी' या सारख्या प्रसिद्ध कार आणि 'चेल्सी' व 'आर्सनेल' सारख्या फुटबॉल टीमचे नाव याचे निषेध केले. याच प्रकारे विज्ञान कल्पना (साइंस फिक्शन)च्या काही शब्दांवर ही प्रतिबंध लावले गेले आहे.

मागील वर्षी पर्यंत अमेरिकाचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाचे ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोअर आहे.

ट्विटरचा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्वीट केले जातात. ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्वीट केले जातात.ट्विटरच्या लोगोमध्ये जो पक्षी आहे त्याच नाव लैरी आहे.ट्विटर वर सर्वात जलद 1 मिलियन followers बनवणार अकाऊंट Caitlyen Jenner याच आहे. त्याचे 1 मिलियन Followers फक्त 4 तास आणि 3 मिनिटात झाले होते.

खाजगी कंपनी[संपादन]

ऑक्टोबर २०२२ मध्ये एलोन मस्कने ही कंपनी ३,५६४ अब्ज रुपयांना (४४ अब्ज डॉलर) विकत घेतली व जुलै २०२२ मधेय ट्विटर च नाव बदलून एक्स ( X ) करण्यात आले आहे .